आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्होडाफोनच्या मोबाईलधारकांना 'ट्‍विटर' अ‍ॅक्सेस अगदी मोफत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- व्होडाफोन ग्राहकांसाठी खूश खबर आहे. व्होडाफोन कंपनीने आपल्या सर्व ग्राहकांना मायक्रोब्लॉगिंग साईट 'ट्‍विटर'चा मोफत अ‍ॅक्सेस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. व्होडाफोनचे प्रीपेड आणि पोस्टपेड अशा सर्व ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. ब्लॅकबेरी हॅन्डसेट असलेल्या ग्राहकांना मात्र या मोफत ट्‍विटर अ‍ॅक्सेसचा लाभ घेता येणार नसल्याचेही कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.
एक नोव्हेंबरपर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. त्यामुळे पुढील तीन महिने ही सेवा सर्व ग्राहकांना मिळणार आहे. 'ट्‍विटर'ची सेवा मोफत घेण्यासाठी फक्त मोबाईल फोनच्या इंटरनेट ब्राऊसरमधून 'mobile.twitter.com' असे टाईप करून किंवा 'ट्‍विटर'च्या अधिकृत मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमधून 'ट्‍विटर अ‍ॅक्सेस' करावे लागणार असल्याचेही कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.