आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीतही केरळच्‍या पर्यटनात वाढ, राज्‍यात आठ प्रोत्‍साहन केंद्र स्‍थापणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मंदीची स्थिती असतानाही केरळ पर्यटन विभागाने गेल्या वर्षात तब्बल 21 हजार कोटी रुपयांचे महसूल मिळवून राज्याच्या तिजोरीत महत्वाची भर घातली आहे. आगामी काळात अमेरिका आणि जपानसह 16 देशातील पर्यटकांना देशात येताच क्षणी व्हिसा दिला जाणार असल्‍याची माहिती पर्यटन खात्याचे सचिव सुमन बिल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही आकडेवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

केरळात येणारी पर्यटक संख्या पाहता त्यात परदेशी पर्यटक संख्या 7.33 (2011) लाखांवरून 7.94 (2012) लाख झाली आहे असे नमूद करून ते म्हणाले, की यंदा त्यात आणखी आठ टक्के वाढ अपेक्षित आहे. रुपया घसरल्याने पर्यटक केरळात येण्यास प्राधान्य देतील. ही संख्याही 93 लाखांवरून 1.1 कोटींवर गेली आहे. परदेशी पर्यटक आल्याने परकी चलन प्रमाण 4221 कोटी रुपयांवरून 4548 कोटी रुपये झाले आहे.

वाढत्या पर्यटक संख्येने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष महसुलात दोन हजार कोटी रुपये वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मिडियाने या वाढीत महत्वाची भूमिका बजावल्याचे नमूद करून बिल्ला म्हणाले, की यंदा नागपूर आणि पुण्यासह आठहून अधिक शहरात पर्यटन प्रोत्साहन घेतले जाणार आहेत. त्यातून आम्हाला चांगला फायदा होणार आहे.

गेल्या काही वर्षात आयुर्वेदिक उपचारासाठी केरळात येणारे पर्यटक वाढले असून त्यांच्यासाठी आम्ही खास योजना अंमलात आणत असल्‍याचेही त्यांनी सांगितले.