आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोयोटाच्या इटिओस, लिव्हा आता नव्या रूपात...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने नुकत्याच राबवण्यात आलेल्या टोयोटा युनिव्हर्सिटी क्रिकेट चॅम्पियनशिपच्या (टीयूसीसी) अंतिम सामन्याच्या वेळी इटिओस आणि लिव्हाचे नव्या रूपातील मॉडेल सादर केले. भारतीय बाजारपेठेसाठी तयार करण्यात आलेली इटिओस कार 2010 मध्ये, तर लिव्हा कार 2011 मध्ये सादर करण्यात आली होती. सध्या कंपनीने या दोन्ही कारचे दीड लाख ग्राहक जोडले आहेत.

तरुण पिढीला नजरेसमोर ठेवून या दोन्ही गाड्यांचे रूप बदलण्यात आले असल्याचे कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकांनी (विक्री) सांगितले. लिव्हाची ही टीआरडी स्पोर्टिव्ह आवृत्ती आहे. जपानमध्ये विकसित करण्यात आलेली ही आवृत्ती टोयोटा रेसिंग डेव्हलपमेंट रेसिंग कार अशी ओळख निर्माण करेल. यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिन, 90 पीएस इंजिन, एबीएस, जी प्लस पी एअरबॅग आणि 15 स्मोक्ड अलॉय आहेत.

फीचर्स
1> नवे 2 डीन ऑडिओ, ब्ल्यूटूथ, यूएसबी, ऑक्स इन आणि रिमोट.
2> नवे आसन, ड्रायव्हर सीट अ‍ॅडजस्टमेंट सुविधा
3> हेडरेस्ट अ‍ॅडजस्टमेंटची सोय
इंटिरियर
1> टू टोन प्रीमियम इंटिरियर्स-डॅशबोर्डमध्ये स्टायलिश टेक्श्चर, सॉफ्ट फॅब्रिक आणि अ‍ॅश ब्राऊन रंगातील क्लासी लूक
2>वूडन फिनिश आर्मरेस्ट