आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'टोयोटा\' परत बोलावणार 45 हजार इनोव्हा कार; दोषपूर्ण \'स्टेअरिंग\'साठी घेतला न‍िर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि जापानची ज्वाइंट व्हेचंर कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटारने तब्बल 44 हजार 989 इनोव्हा कार परत बोलावण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. फेब्रुवारी 2005 ते डिसेंबर 2008 या काळात निर्मिती झालेल्या इनोव्हा कारमधील दोषपूर्ण स्टेअरिंगच्या दुरुस्तीसाठी कंपनीने हा न‍िर्णय घेतला आहे. इनोव्हा कारच्या स्टेअरिंग व्हीलच्या स्पायरल केबलमध्ये दोष आढळला असून याबाबत ग्राहकांकडून तक्रारी आहेत.

सध्या कंपनी रिप्लेसमेंट पार्ट्‍सवर काम करत आहे. पार्ट्‍स उपलब्ध झाल्यानंतर ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत डिलरद्वारा संपर्क करण्यात येणार आहे. डिलरतर्फे ग्राहकांनी दोषपूर्ण पार्ट्‍स बदलून मिळणार आहे. विशेष म्हणजे हे काम विनामुल्य केले जाणार आहे. पार्ट्‍स बदलण्याच्या कामास एक तासाचा अवधी लागणार आहे.
संपूर्ण जगातून सुमारे 6.58 मिलियन कार परत बोलावण्यात आल्या आहेत. ग्लोबल ऑटो इंडस्ट्रीच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने कार परत बोलावण्याची ही पहिलीच घटना असावी.