आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोयोटा 45 हजार इनोव्हा कार रिकॉल करणार, स्टिअरिंग व्हीलमधील केबलमध्ये दोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्टिअरिंग व्हीलमधील केबलमध्ये दोष आढळल्याने टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीने 44,989 इनोव्हा कार रिकॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2005 ते डिसेंबर 2008 या काळात निर्मित इनोव्हा कार कंपनी रिकॉल करणार आहे.
कंपनीची जपानी पालक असणार्‍या टोयोटा मोटार्सने जागतिक स्तरावर 6.39 दशलक्ष कार रिकॉल करण्याचे जाहीर केले आहे. इनोव्हा रिकॉल करण्याची मोहीम याच जागतिक योजनेचा भाग आहे. टोयोटा-किर्लोस्कर समूहाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, इनोव्हा कारच्या स्टिअरिंग व्हीलमधील स्पायरल केबलमध्ये दोष असल्याने रिकॉल मोहीम राबवण्यात येत आहे. यामुळे कारमधील चालकाची एअरबॅग निष्क्रिय होत असल्याचे तसेच एअरबॅगबाबतची सूचना देणारा दिवा यामुळे सतत प्रकाशमान होत असल्याचे आढळून आले असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. याला पर्यायी भागाची उपलब्धता लवकरच होणार असून तो भाग उपलब्ध झाल्यास टोयोटाच्या अधिकृत वितरकाकडून ग्राहकांना कळवण्यात येणार आहे. दोषी भाग मोफत बदलून देण्यात येणार असून त्यासाठी एक तासाचा अवधी लागेल, असे टोयोटा-किर्लोस्करतर्फे स्पष्ट करण्यात आले.
जगात सर्वाधिक कार निर्मिती करणार्‍या टोयोटानेही जागतिक स्तरावर 25 कारच्या विविध मॉडेलमध्ये दोष आढळल्याने 6.39 दशलक्ष कार रिकॉल केल्या आहेत. स्टिअरिंग व्हील केबलमध्ये दोष तसेच सीट रेल्स, इंजिन स्टार्टर्स आणि विंडशिल्ड वायपर मोटर्स यातील दोषांमुळे ही रिकॉल मोहीम राबवण्यात येत आहे.