आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मिळेल अनावश्यक परदेशी एसएमएसपासून मुक्ती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - परदेशातून येणा-या अनावश्यक एसएमएसवर बंदी आणण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. काही महिन्यांपूर्वी लोकांची अनावश्यक एसएमएसपासून सुटका झाली होती, परंतु परदेशी मार्गाने पुन्हा एकदा एसएमएसचा भडीमार सुरु झाला. आता दिवसभर अनावश्यक एसएमएस येतात, त्यातील अधिकांश एसएमएस परदेशी मार्गाने येतात. यावर बंदी आणण्याची तयारी सुरु आहे. टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन नियम तयार केले आहेत. आता या नव्या कायद्यामुळे परदेशी ऑपरेटर्सच्या माध्यमातून येणा-या एसएमएसवर नियंत्रण येणार आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार अनावश्यक एसएमएस जर्मनी, स्वीडन, नारू, फिजी, बोस्निया, कंबोडिया, अल्बानिया, ग्रेनाडा, इंग्लंड, जर्सी, टोंगा, वनातु, नामिबिया, पनामा आदि देशांमधून येत आहेत.
आंतरराष्ट्रीय कोड किंवा + ९१ असणा-या नंबर्सवरून हे एसएमएस येतात. ट्रायने म्हटले आहे की, या नंबर्सवरून दर तासाला जर २०० किंवा अधिक एसएमएस येत असतील तर त्यावर बंदी घातली जाईल. हे एसएमएस कोणत्याही भारतीय नेटवर्कच्या माध्यमातून प्रसारित होणार नाहीत. ऑपरेटर्सनी या कायद्याची अमलबजावणी पुढील ३० दिवसांत करायची आहे.
जगात कोठेही पाठवा एसएमएस, फुकटात!
पाठांतरासाठी आता इ-मेल, एसएमएस, चॅटिंगचा वापर
आता मोबाईलवरून करा रोज १०० ऐवजी २०० एसएमएस