आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • TRAI Suggests Easing Of FDI Limit For Broadcasters, FM Radio To 49%

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एफएम क्षेत्रात 49% एफडीआय : ट्राय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केबल नेटवर्क, डीटीएच सारख्या ब्रॉडकास्ट कॅरेज क्षेत्रात 100 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी द्यावी. तसेच एफएम रेडिओ आणि वृत्तवाहिनी क्षेत्रात एफडीआयचे प्रमाण 49 टक्क्यांपर्यंत वाढवावे, अशा शिफारशी ट्रायने केल्या आहेत.

माहिती आणि प्रसारण खात्याने या क्षेत्रातील एफडीआय वाढवण्याचा वित्त मंत्रालयाचा प्रस्ताव जुलै महिन्यात ट्रायकडे पाठवला होता. ब्रॉडकास्ट कॅरेज सेवा, दूरचित्रवाहिनी आशय सेवा आणि एफएम रेडिओ सेवा या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक किती असावी, या बाबत ट्रायकडून माहिती मागवण्यात आली होती.