आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transactions At ATM Will Be Costlier From November

ATM चा वापर महाग: खात्याची मोफत माहिती आणि चेकबुक रिक्वेस्टवरही गदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लवकरच तुम्ही तुमच्या बँक एटीएमचा मर्यादित वापर करण्यास सुरु कराल. यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून तुम्ही तुमच्या बँक एटीएममधून प्रत्येक महिन्यात केवळ 5 आणि इतर बँक एटीएममधून 3 ट्रँजेक्शन मोफत करू शकाल. त्यानंतर एटीएममधून प्रत्येक ट्रँजेक्शनसाठी तुम्हाला 20 रुपये द्यावे लागतील. हे पैसे तुमच्या खात्यातून कापले जातील. ट्रँजेक्शनमध्ये केवळ पैसे काढणे एवढेच नाही तर खात्याची माहिती, चेकबुक रिक्वेस्ट आणि मोबाइल रिचार्जचा व्यवहार ग्राह्य धरला जाईल.

सहा मेट्रो शहरात लागू होणार नवा नियम
रिझर्व्ह बँकेच्या अनुमतीने हा नियम देशातील सहा मेट्रो दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, कोलकाता आणि हैदराबाद शहरात लागू होणार आहे.
छोट्या, बेसिक खाते धारकांना दिलासा
छोट्या, बेसिक खाते धारकांच्या खात्यावर हा नियम लागू होणार नाही असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. देशातील सहा मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्ये हा नवीन नियम लागू होणार नाही. मार्च 2014 च्या स्थितीनुसार देशभरात 1.6 लाख एटीएम आहेत.