आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Travel By Airplane Because Its Ticket Rate Low Compare To Railway, Spice Jet New Scheme

रेल्वेपेक्षा कमी तिकीट दरात करा विमान प्रवास, स्पाइस जेटची नवी योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्ही आतापर्यंत विमान प्रवास केला नसेल आणि कुठे प्रवासाला जाण्याचा तुमचा बेत असेल तर एक आनंदाची बातमी आहे. स्पाइस जेटने तीन दिवसांसाठी रेल्वेपेक्षा कमी दरात विमान प्रवासाची संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीच्या ऑफरनुसार तीन दिवस 50 टक्क्यांहून कमी दरात विमान प्रवास करता येणार आहे. स्पाइस जेटने निवडक मार्गासाठी ही कमी दरातील ऑफर जाहीर केली आहे. रेल्वेच्या तिकीट दरापेक्षा कमी पैशात यामुळे विमान प्रवास करता येणार आहे.
कमी पैशात विमान प्रवास घडवणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या स्पाइस जेट या कंपनीने ही विशेष सवलत योजना आणली आहे. या योजनेनुसार, 23 जानेवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत स्पाइस जेटच्या सुपर सेल ऑफरअंतर्गत तिकिटे बुक करणा-यांना याचा लाभ मिळणार आहे. सुपर सेल ऑफरमध्ये 50 टक्क्यांहून कमी दरात तिकिटे उपलब्ध आहेत. ही सवलत मूळ दर (बेस फेअर) व इंधन अधिभार (फ्युएल सरचार्ज). स्पाइस जेटने या ऑफर अंतर्गत मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी 2830 रुपये भाडे ठरवले आहे. या मार्गाचे रेल्वे प्रवासाचे प्रथम श्रेणी वातानुकूलितचे भाडे आहे 3463 रुपये. दिल्ली ते गोवा जाण्यासाठी स्पाइस जेटने 3355 रुपये, मुंबई ते कोलकाता जाण्यासाठी 3090 रुपये भाडे या ऑफर अंतर्गत आकारण्यात येणार आहे. याशिवाय हैदराबाद ते कोलकातासाठी 2729 रुपये, बंगळुरू ते दिल्लीसाठी 3444 रुपये तर बंगळुरू ते मुंबईसाठी 1902 रुपये तिकीट दर ठेवण्यात आले आहेत.
प्रवासी वाढवण्यासाठी...
स्पाइस जेटचे सीएफओ एस. एल. नारायणन यांनी सुपर सेल ऑफरबाबत सांगितले की, फेब्रुवारी ते एप्रिल हा विमान कंपन्यांसाठी ऑफ सीझन असतो. या हंगामात फारशी तिकीट विक्री होत नाही. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठीच ही स्वस्त दरातील तिकिटांची योजना कंपनीने सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत किती तिकिटे विक्री करायची हे अद्याप ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले. ही ऑफर 21 जानेवारी ते 23 जानेवारी या काळात उपलब्ध आहे.
०निम्म्या दरात मिळणार हवाई सफरीचा आनंद
०स्पाइस जेटची तीन दिवसांची ऑफर