आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रक वाहतूक भाड्यात चार टक्के घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लघु आणि मध्यम उद्योगाकडून माल मिळण्याचे प्रमाण 25 टक्के घटल्याने मेमध्ये ट्रकच्या भाड्यात तीन ते चार टक्के घट झाली आहे.
लघु आणि मध्यम उद्योगाकडून झालेल्या निराशेत उन्हाळी भाजीपाला आणि फळांच्या वाहतुकीने ट्रक वाहतुकीची स्थिती काहीशी सांभाळली. गहू तसेच भाजीपाल्याच्या मागणीने ट्रकसाठी काम मिळाले अन्यथा स्थिती आणखी बिघडली असती. 2009 च्या नंतर 2012 पर्यंत सातत्याने ट्रक वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. त्यानंतर आता मालच न मिळाल्याने ट्रक वाहतुकीच्या दरात घट होण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.
देशातील एका आघाडीच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यकारी संचालकांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत वाहतुकीसाठी माल मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे छोट्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांची स्थिती बिकट झाली आहे. त्यांनी सांगितले की, आमचा एका मोठ्या कंपनीशी वाहतुकीचा करार आहे. त्यामुळे माझ्या कारभारावर फारसा परिणाम जाणवत नाही. मात्र ज्या ट्रान्सपोर्ट कंपन्या लघु आणि मध्यम उद्योगावर अवलंबून आहेत. त्या कंपन्यांना सध्या ट्रक लोड करण्यासाठी मालच मिळत नाही. हरियाणा आणि पंजाबात तर एक ट्रक लोड करण्यासाठी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. मेमध्ये ट्रकद्वारे होणा-या वाहतुकीत 12 ते 15 टक्के घट दिसून आली.
स्थिती बिकट
मंदावलेल्या अर्थचक्राचा परिणाम ट्रक वाहतुकीवर झाला आहे.
मेमध्ये सलग दुस-या महिन्यात माल नसल्याने वाहतुकीच्या भाड्यात घट आली आहे.