आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रम्फ बाइक : बोनव्हिले आता स्वस्त किमतीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रम्फ या ब्रिटिश मोटारसायकल निर्माता कंपनीची ही बेसिक बाइक आहे. नुकतीच ही भारतीय बाजारपेठेत उतरवण्यात आली. बोन 1959 मध्ये बोनव्हिले सर्वप्रथम सादर करण्यात आली होती. त्यानंतर बाइकमध्ये तंत्रज्ञानविषयक आणि लूकनुसार बदल करण्यात आले. मात्र बाइकचे पारंपरिक डिझाइन आणि क्लासिक नेचर जैसे थे ठेवण्यात आले आहे.

>बाइकच्या रेट्रो लूकमुळे तिला क्लासिक बाइक म्हटले जाते. बोनव्हिलेला चिरकाळ अशी रेट्रो स्टायलिंग देण्यात आली आहे. बाइकलव्हर्स तिला ‘बोनी’ असेही म्हणतात.

> यात काही उणिवादेखील आहेत. उदा. इग्निशनपर्यंत सहजपणे हात पोहोचत नाही. लॉकेबल फ्यूएल फिलर कॅप क्वॉलिटी काही खास नाही. त्यात सुधारणा होऊ शकते.

> लहान आकारातील अलॉय व्हिलने बाइक आधुनिक दिसते. गोलाकारातील हेडलाइट, क्रोम-रिच ट्विन एक्झॉस्ट आणि सिंपल टेल-लाइटमुळे बाइकला आयकॉनिक इमेज मिळाली.

> लो-सीट असल्याने बाइक चालवणे आरामदायी वाटते. स्पेशियस रायडिंग कम्फर्टसाठी हँडलबार आणि फूट-पेग नेमक्या ठिकाणी बसवले आहे. बाइकचे क्लच अ‍ॅडजस्टेबल अहे. पाम ग्रिप
सॉफ्ट आहे.

> इंजिन रिफाइंड असून त्याचा अर्थ ती सर्व लँड-स्पीड रेकॉर्ड तोडू शकते असे नाही. मात्र चालकाला निराश करत नाही.

> बाइकच्या केबल ऑपरेटेड क्लचने बोनीचा परफॉर्मन्स उत्कृष्ट होतो. स्विचगिअरमध्ये आवश्यक त्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत.

> यात एबीएस असिस्टंस नाही. सिंगल 310 एमएम डिस्क पुढे आणि 255 एमएम डिस्क मागे आहे.

> क्लासिक डिझाइनची कल्पना करून बाइक अ‍ॅनलॉग स्पीडोमीटरसह ओडोमीटर, क्लॉक आणि ट्रिप इन्फॉर्मेशन देण्यात आली आहे. ही भारतात उतरवण्यात आलेली सर्वात स्वस्त ट्रम्फ बाइक आहे.

ट्रम्फ बोनव्हिले
इंजिन लेआउट: पॅरलल ट्विन, एअर कूल्ड, फोर-स्ट्रोक
पॉवर: 7500 आरपीएम प्रति 67 बीएचपी
टॉर्क: 5800 आरपीएम 6.93 किग्रॅ
गिअरबॉक्स: 5-स्पीड, 1-डाउन, 4 अप
फ्यूएल: 16 लीटर
एल/डब्ल्यू/एच: 2115/790/1130 एमएम

किंमत: 5.7 लाख
(एक्स शोरूम, नवी दिल्ली)

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, वैशिष्ट्‍ये...