आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Mobile ,cable,dth Service Under One Umbrella Recomandation Of Telecom Committee

दोन फोन, केबल, डीटीएच सेवा एकाच छताखाली - दूरसंचार समितीची शिफारस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी काळात टेलिकॉम व ब्रॉडकास्टिंग सेवा क्षेत्रात मोठ्या बदलाची शक्यता आहे. दूरसंचार विभागाच्या (डॉट) एका समितीची शिफारस मंजूर झाल्यास हे शक्य आहे. या समितीने टेलिकॉम आणि ब्रॉडकास्टिंग सेवांसाठी एकीकृत परवान्याची शिफारस केली आहे. अशा परवानाधारक कंपनीला आपल्या ग्राहकांना मोबाइल तसेच लँडलाइन फोन सेवांबरोबरच डीटीएच आणि केबल टीव्हीसारख्या सुविधा पुरवणे शक्य होणार आहे. म्हणजेच ग्राहकाला एकाच कंपनीचे मोबाइल, लँडलाइन फोन, केबल टीव्ही आणि डीटीएच यांसारख्या सेवा मिळवता येतील. एवढेच नव्हे, तर यासाठी त्या कंपनीकडे पुरेशा पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) असणे आवश्यक नाही.

दूरसंचार समितीने राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 2012 अंतर्गत एकीकृत परवाना पद्धतीवर सादर केलेल्या अहवालात युनिफाइड लायसन्स (सर्व्हिस डिलिव्हरी) या नव्या परवान्याचा प्रस्ताव दिला आहे. हा परवाना मिळालेल्या ऑपरेटरला आपल्या ग्राहकांना इतर कंपन्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरून सर्व दळणवळण (कम्युनिकेशन) सेवांचा पुरवठा करणे शक्य होणार आहे, हे या युनिफाइड परवान्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे.यासाठी लागणा-या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करताना स्वत: ऑपरेटरला ते निश्चित करावे लागणार नाही. सध्याच्या नियमात अशी सवलत नाही. सध्याच्या नियमानुसार ऑपरेटरला आधी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे लागते. त्यानंतरच तो ग्राहकांना सेवा पुरवठा करू शकतो. नव्या परवाना पद्धतीमुळे कंपन्यांना एकाच प्लॅटफार्मवरून सर्व सेवा देणे शक्य होणार आहे.
प्रस्ताव काय आहे : दूरसंचार समितीने टेलिकॉम आणि ब्रॉडकास्टिंग सेवांसाठी युनिफाइड लायसन्स (सर्व्हिस डिलिव्हरी) या नव्या एकीकृत परवान्याची शिफारस केली आहे.

ग्राहकांना काय मिळणार
फिक्सड टेलिफोन, मोबाइल फोन, फिक्स्ड लाइनद्वारे ब्रॉडबँड सेवा, वायरलेस ब्रॉडबँड सेवा, केबल टेलिव्हिजन, सॅटेलाइट टेलिव्हिजन आणि आयपीटीव्ही या सर्व सेवा एकाच ऑपरेटरकडून मिळणे शक्य होईल.

आणखी काय सुविधा
आगामी काळात सर्व सेवांसाठीचे एकच बिल ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या सेवांसाठी पैसे भरणे अधिक सुलभ होईल.
ऑपरेटरसाठी सवलत
परवाना मिळालेल्या ऑ परेटरला आपल्या ग्राहकांना इतर कंपन्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरून सर्व दळणवळण (कम्युनिकेशन) सेवांचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.