आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणखी फायदेशीर करण्यासाठी सरकारकडे दोन प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणखी फायदेशीर करण्यासाठी सरकारकडे दोन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. एक म्हणजे पीएफ निधीत जास्त गुंतवणूक करण्याची सूट आणि दुसरे, फंड जमा करणा-यांस घर देण्याचा प्रस्ताव आहे. या खात्याचे प्रभारी मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांनी कर्मचारी भविष्य निधी संघटनला (ईपीएफओ) नुकत्याच केलेल्या सूचनेनंतर ईपीएफओने या कामी लक्ष घालणे सुरू केले आहे.
मूळ पगाराच्या 10 % आणखी रक्कम जमा करण्याची सवलत
कर्मचा-यांना आपल्या पगारातील आणखी दहा टक्के वाटा पीएफमध्ये जमा करावयाचा असेल तर त्यांना तशी सवलत मिळावी. सध्या मूळ पगाराच्या दहा टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा होत आहे. कंपनी मालक तेवढेच पैसे जमा करतात.
फायदा : फिक्स वगळता अन्य जमा योजनांच्या तुलनेत जास्त व्याज. 8.75 टक्के. पीपीएफप्रमाणे लांब लॉकइन पीरियड नाही. कर्ज घेऊ शकता.
निवृत्तीनंतर घर मिळू शकेल
ठरावीक रक्कम आणि पीएफ बॅलन्स असल्यानंतर खातेदाराला घर दिले जाऊ शकते. ते ईडब्ल्यूएस किंवा एलआयजीप्रमाणे असतील. घरे बाह्य वस्तीत असतील. सिंगापूरमध्ये अशी व्यवस्था आहे. तिथे पगारातील 40 टक्क्यांपर्यंत रक्कम पीएफमध्ये जमा केली जाते.
फायदा : निवृत्तीनंतर वयोवृद्ध नागरिकांना या घराचा मोठा आधार होऊ शकतो. अशा घरांमध्ये जवळपास एकाच वयाचे नागरिक राहतील. त्यामुळे त्यांना आपोआप एकमेकांची मदत होईल.
सिंगापूर मॉडेलचा अभ्यास सुरू
‘पीएफ निधीत अतिरिक्त पैसे जमा करण्याच्या योजनेवर विचार सुरू आहे. या व्यतिरिक्त घर देण्याच्या योजनेसाठी सिंगापूर मॉडेलचा अभ्यास केला जात आहे. याबरोबर व्यावहारिकदृष्ट्या आपल्या देशात त्याचा कितपत उपयोग होईल, हे पाहिले जाईल. यामध्ये जमीन कुठे मिळेल, त्यावर खर्च किती येईल, आदी बाबींचा समावेश असेल. - के. के. जालान, केंद्रीय भविष्य निधी आयुक्त