आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील दोन तृतीयांश कंपन्यांकडून 2013 मध्ये नोकर भरतीचे संकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगभरातील अर्थव्यवस्थांवर मंदीचे मळभ दाटले असताना भारत सर्वाधिक आशावादी अर्थव्यवस्था म्हणून समोर येत आहे. देशातील दोनतृतीयांश कंपन्यांकडून नोकर भरतीचे संकेत आहेत. करिअर बिल्डर या संस्थेने केलेल्या जगातील 10 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांसाठीचा रोजगार अंदाज जाहीर केला. त्यात हे निरीक्षण नोंदवण्यात आले.

करिअर बिल्डरच्या मते, भारतातील 67 टक्के कंपन्या यंदा स्थायी तसेच पूर्णकालीन कर्मचा-या च्या भरतीची योजना आखत आहेत, तर 13 टक्के कंपन्या कर्मचारी कपातीचा विचार करत आहेत. तसेच 17 टक्के कंपन्यांचा कर्मचारी संख्या वाढवण्याचा तसेच ती कमी करण्याच्या विचारात नाहीत.बिकट आर्थिक परिस्थितीतही विकसनशील अर्थव्यवस्थांत नव्या नियुक्त्यांबाबत उत्साह आहे. संस्थेच्या अहवालानुसार, नव्या रोजगारनिर्मितीबाबत ब्राझीलमध्ये सर्वाधिक उत्साह आहे. तेथे 71 टक्के कंपन्या नव्या रोजगार संधी उपलब्ध करून देणार आहेत. यात भारत दुस-या क्रमांकावर आहे. देशातील 67 टक्के कंपन्यात नोक-या च्या संधी उपलब्ध होणार आहेत. चीनमध्ये 52 टक्के कंपन्यांनी नव्या नियुक्त्यांबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, तर रशियातील 48 टक्के कंपन्या नव्या रोजगार संधी देण्याच्या तयारीत आहेत.

या आघाडीवर जगातील विकसित अर्थव्यवस्थांत मात्र मरगळ दिसून येते. अमेरिकेत यंदा नव्या रोजगार संधीबाबत 26 टक्के कंपन्यांनी कौल दिला आहे. जर्मनीत हीच संख्या 29 टक्के, इंग्लंडमध्ये 30 टक्के आहे. जपानमध्ये 22 टक्के कंपन्या नव्या नोक-या देण्याच्या विचारात आहेत. फ्रान्समध्ये 24 टक्के कंपन्यांचा तसा विचार आहे, तर इटलीत हेच प्रमाण 19 टक्के आहे. इटलीत 33 टक्के कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे संकेत दिले आहेत. ब्राझीलमध्ये आगामी काळात फुटबॉल वर्ल्ड कप तसेच समर ऑ लिम्पिक होणार आहे. तसेच तेथील निर्मिती उद्योगही बहरण्याची आशा आहे. त्यामुळे तेथील 71 टक्के कंपन्यांनी नोकर भरतीचे संकेत दिले आहेत. सर्वेक्षणाबाबत करिअर बिल्डरचे सीईओ, मॅट फर्ग्युसन यांनी सांगितले, ब्रिक (ब्राझील, रशिया, भारत व चीन) देशांत नव्या रोजगार संधी देण्याबाबत अधिक सकारात्मक वातावरण आहे. वित्तीय संकटामुळे युरोपात मात्र याबाबत फारसे उत्साहवर्धक चित्र नाही. जगभरात नियुक्त्यांबाबत कंपन्या अधिक सावध असल्याचे चित्र आहे.

ब्राझील शायनिंग
ब्राझीलमध्ये आगामी काळात फुटबॉल वर्ल्ड कप तसेच समर ऑ लिम्पिक होणार आहे. तसेच तेथील निर्मिती उद्योगही बहरण्याची आशा आहे. त्यामुळे तेथील 71 टक्के कंपन्यांनी नोकर भरतीचे संकेत दिले आहेत. जर्मनीत हीच संख्या 29 टक्के, इंग्लंडमध्ये 30 टक्के आहे. युरोपात वित्तीय संकटामुळे कंपन्या फारशा आशावादी नाहीत. इटलीत 33 टक्के कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे संकेत दिले आहेत.