Home | Business | Auto | two wheelar and four wheeler sale increases in may

दुचाकी, चारचाकी वाहनांच्या विक्रीत मे महिन्यात वाढ

वृत्तसंस्था | Update - Jun 11, 2011, 03:47 AM IST

मे महिन्यात देशात सर्व वाहनांची चांगली विक्री झाली

  • two wheelar and four wheeler sale increases in may

    नवी दिल्ली- मे महिन्यात देशात सर्व वाहनांची चांगली विक्री झाली. कारच्या विक्रीत गतवर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात ७ टक्के वाढ दिसून आली. गतवर्षी मे महिन्यात १४८४२५ कारची विक्री झाली, तर यंदाच्या मेमध्ये १५८८१७ कारची विक्री झाली. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम) ने यासंदर्भातील आकडेवारी गुरुवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार गतवर्षी मे महिन्यात ७२५३११ मोटारसायकलींची विक्री झाली. यंदाच्या मे महिन्यात ती १४.३३ टक्क्यांनी वाढून ८२९२५५ इतकी झाली.गतवर्षी मे महिन्यात सर्व प्रकारच्या वाहनांची एकूण विक्री १३७०७८६ अशी होती. ती यंदाच्या मे महिन्यात १२०८८२० इतकी झाली. गतवर्षीच्या तुलनेत ही विक्री १३.४० टक्क्यांनी अधिक आहे.

Trending