आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two wheelers Costlier As Honda, Bajaj, TVS Hike Prices

मोटारसायकल महागल्या, आघाडीच्या कंपन्यांनी वाढवल्या बाईकच्या किमती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली, गुडगाव- बजाज ऑटो आणि होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया या देशातील आघाडीच्या मोटारसायकल निर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या मोटारसायकलींच्या किमतीत वाढ केली आहे. होंडाच्या सर्व मोटारसायकल मॉडेलनिहाय 200 ते 800 रुपयांपर्यंत महागल्या, तर बजाजने त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किमती 500 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. होंडाच्या नव्या किमती एक एप्रिलपासून, तर बजाज मोटारसायकलच्या नव्या किमती 12 एप्रिलपासून लागू झाल्या आहेत.

मोटारसायकल क्षेत्रात देशात तिसऑ या क्रमांकावर असणाऑ या बजाज ऑटोने आपल्या सर्व मोटारसायकलच्या किमती 300 ते 500 रुपयांनी वाढवल्या आहेत. बजाज ऑ टोचे अध्यक्ष (मोटारसायकल बिझनेस) के. श्रीनिवास यांनी सांगितले, लॉजिस्टिक आणि इतर खर्चात झालेल्या वाढीमुळे मोटारसायकलच्या किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला. बजाजच्या सर्व मोटारसायकलच्या किमती 300 ते 500 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. मोटारसायकलचे नवे दर 12 एप्रिलपासून लागू झाले आहेत. बजाज ऑटोच्या वेबसाइटवरील माहितीनुसार कंपनीची एंट्री लेव्हल बाइक प्लॅटिनाची किंमत आता 39,293 रुपये आहे. डिस्कव्हर श्रेणीतील मोटारसायकल आता 44,800 ते 52,940 रुपयांत उपलब्ध होणार आहे. पल्सर श्रेणीतील मोटारसायकली 58,963 ते 70,321 रुपयांदरम्यान उपलब्ध होतील. बजाज मोटारसायकलच्या सर्व किमती एक्स शो-रूम दिल्ली येथील आहेत.

डिझेलमुळे होंडाने वाढवल्या किमती :
होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया कंपनीने त्यांच्या सर्व बाइक्सच्या किमती 800 रुपयांपर्यंत वाढवल्या. होंडा मोटारसायकलचे उपाध्यक्ष (विक्री व मार्केटिंग) वाय. एस. गुलेरिया यांनी सांगितले, गेल्या काही महिन्यात डिझेलचे दर वाढल्याने कंपनीने सर्व मोटारसायकलींच्या किमती 200 ते 800 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. नवे दर एक एप्रिलपासून लागू झाले आहेत. डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक महागली आहे. त्यातच विमाही महागला, त्यामुळे खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला.


टीव्हीएसची आघाडी
चेन्नईस्थित टीव्हीएस मोटार कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, कंपनीने त्यांच्या मोटारसायकलींच्या किमती या आधीच 0.25 टक्के ते 0.50 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. नवे दर 4 एप्रिलपासून लागू झाले.

वाढ अपरिहार्य
डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक महागली आहे. खर्चात मोठी वाढ झाली. त्यामुळे किमती वाढवणे अपरिहार्य आहे. वाय. एस. गुलेरिया, उपाध्यक्ष-विक्री, होंडा मोटारसायकल

खर्चात वाढ झाल्याने निर्णय
लॉजिस्टिक आणि इतर खर्चात झालेल्या वाढीमुळे मोटारसायकलच्या किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला.
के. श्रीनिवास, अध्यक्ष (मोटारसायकल बिझनेस), बजाज ऑ टो


होंडा बाइकचे नवे दर
44,718 ते 53,547 रुपये डिओ, अ‍ॅक्टिव्हा, एव्हिएटर
45,101 रुपये ते 1.77 लाख मोटारसायकल श्रेणी


बजाज बाइकचे नवे दर
प्लॅटिना 39,293 रुपये
डिस्कव्हर श्रेणी 44,800 ते 52,940 रु.
पल्सर श्रेणी 58,963 ते 70,321 रु.