आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स हा 30 शेअर्सचा आणि निफ्टी 50 शेअर्सचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निफ्टीतील 50 शेअर्स हे 22 विविध सेक्टरमधील आणि सेन्सेक्समधील 30 शेअर्स हे 10 विविध सेक्टरमधील
शेअरमार्केट म्हटले की सेन्सेक्स व निफ्टी हे दोन शब्द हमखास ऐकायला मिळतात. सेन्सेक्स व निफ्टी हे अनुक्रमे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या दोन एक्स्चेंजचे निर्देशांक आहेत. मोठ्या, महत्त्वाच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोणत्या दिशेने जात आहेत, खाली की वर, ते या दोन निर्देशांकांमुळे चटकन कळते. सेन्सेक्स हा 30 शेअर्सचा व निफ्टी हा 50 शेअर्सचा मिळून बनलेला असतो. सेन्सेक्स व निफ्टी वर आहे म्हणजे त्यातील शेअर्सचे भाव कालच्यापेक्षा आज सरासरीने वर आहेत आणि खाली आहे म्हणजे त्यातील शेअर्सचे भाव कालच्यापेक्षा आज सरासरीने खाली आहेत.

शेअरमार्केटमध्ये सर्वसाधारण काय स्थिती आहे, याचा अंदाज या निर्देशांकांवरून येत असला तरी खुद्द या सेन्सेक्स व निफ्टीमधील 30 व 50 शेअर्सचे भाव एकाच दिशेने असत नाहीत. या 30 व 50 पैकी काही शेअर्स वर तर काही खाली अशी स्थिती बहुतेकवेळा असते. तसेच शेअरमार्केटमधील हे दोन्ही निर्देशांक इतर शेअरचे भाव फालो करत नाही मात्र आज मार्केट वर आहे म्हटले जाते, तेव्हा त्याचा अर्थ असतो हे दोन निर्देशांक वर आहेत, म्हणजेच ते मार्केटची स्थितिदर्शक आहेत. सेन्सेक्स हे सेन्सेटिव्ह इंडेक्स याचे चटकदार संक्षिप्त रूप आहे. तसेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने ‘स्टॅँडर्ड अ‍ॅँड पूअर’शी (एस अ‍ॅँड पी) सहयोग केल्यामुळे सेन्सेक्सला अधिकृत शब्द ‘एस अ‍ॅँड पी बीएसई सेन्सेक्स’ असा आहे. सेन्सेक्स हा 1 जानेवारी 1986 ला प्रथम कम्पाइल करण्यात आला. सेन्सेक्ससाठी 1978-79 हे आधारभूत वर्ष व 100 हे आधारभूत मूल्य धरण्यात येते. निफ्टीसाठी 1995 हे आधारभूत वर्ष व 1000 हे आधारभूत मूल्य धरण्यात येते.

सेन्सेक्स व निफ्टी यांचा डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगसाठी खूप उपयोग होतो
या निर्देशांकांत इन्फोसिस, टीसीएस, ओएनजीसी अशा बड्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. निफ्टीतील 50 शेअर्स हे 22 विविध सेक्टरमधील आहेत आणि सेन्सेक्समधील 30 शेअर्स हे 10 विविध सेक्टरमधील आहेत. जसे हे दोन निर्देशांक आहेत तसेच ‘सीएनएक्स ज्युनियर’ व ‘सीएनएक्स मिडकॅप’ हे एनएसईवर अनुक्रमे छोट्या व मिडकॅप कंपन्यांच्या शेअरचे निर्देशांक आहेत आणि बीएसई वर ‘एस अ‍ॅँड पी बीएसई स्मॉलकॅप’ व ‘एस अ‍ॅँड पी बीएसई मिडकॅप’ हे निर्देशांक आहेत. या निर्देशांकाशिवाय दोन्ही एक्स्चेंजवर विविध क्षेत्रांचे निर्देशांकही आहेत. उदा: रिअ‍ॅलिटी, पॉवर, आयटी, ऑटो, बॅँकिंग इत्यादी. ते विशिष्ट क्षेत्र तेजीत आहेत की मंदीत ते या निर्देशांकांवरून सर्वसाधारणपणे कळते. अर्थातच इथेही एकाच क्षेत्रीय निर्देशांकातील सर्व शेअर्स एकाच दिशेने जात नसतात. याशिवायही ‘सीएनएक्स 500’ व ‘एस अ‍ॅँड पी बीएसई 500’ असे 500 मोठ्या कंपन्यांच्या शेअरचे निर्देशांक आहेत, तसेच इतरही काही निर्देशांक आहेत. कंपनीची स्थिती, तिच्या बाजार भांडवलामध्ये, ट्रेडिंगमध्ये बदल या सर्व बाबींचा दर सहा महिन्यांनी आढावा घेण्यात येत असतो. त्यानुसार या निर्देशांकांतील शेअर्समध्ये बदल होत असतो. उदा: ‘एस अ‍ॅँड पी बीएसई ऑटो’ या निर्देशांकातून अशोक लेलॅँड लिमिटेड या शेअरला 23 डिसेंबर 2013 पासून वगळण्यात आले इत्यादी. सेन्सेक्स व निफ्टी यांच्या घटक शेअरमध्येही आवश्यक तेव्हा असे बदल करण्यात येत असतात. उदा: ऑगस्ट 2013मध्ये निफ्टीच्या 50 शेअरपैकी बाजार भांडवलानुसार त्यातील सर्वात छोट्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या शेअरला निफ्टी निर्देशांकातून वगळण्यात आले व त्याजागी विप्रो लिमिटेड या शेअरचा समावेश करण्यात आला.

शेअरचा ईपीएस, पीई, बुक व्हॅल्यू किती आहे जसे आपण बघतो तसेच सेन्सेक्सचा पीई
सेन्सेक्स व निफ्टीबाबत एक गोष्ट ठामपणे लक्षात घ्यावी ते खूप वर गेले म्हणून वाहून जाऊ नये, आपल्याकडे जे शेअर आहेत त्यांची काय स्थिती आहे, ते बघावे. काहीवेळा हे दोन निर्देशांक सर्वोच्च पातळीला आपल्या पोर्टफोलिओमधील शेअर्स आहेत तिथेच अशी स्थिती असू शकते. सेन्सेक्स व निफ्टी वर मात्र मिडकॅप व स्मॉलकॅप इंडेक्स खाली अशी स्थितीही काहीवेळा असते. शेअरचा ईपीएस, पीई, बुक व्हॅल्यू किती आहे जसे आपण बघतो तसेच सेन्सेक्सचा पीई किती आहे हेही बघून अजून मार्केट वर जाईल की पीई खूप जास्त झाल्याने खाली येईल याचे अनुमान वर्तवले जाते. सेन्सेक्सचा पीई साधारण 15 ते 18 असतो. डिसेंबर 2007 मध्ये सेन्सेक्सचा पीई 26.95 झाला होता, तो जणू धोक्याचा इशारा होता. मार्केटमधील शेअर्सचे भाव इतके अवास्तव फुगणे याला ‘बबल’ म्हणतात व ते नंतर कोसळते. याहीबाबतीत जानेवारी 2008 मध्ये मार्केट कोसळले व हाच सेन्सेक्स पीई नोव्हेंबर 2008 मध्ये 11.88 इतका घसरला.

‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’
एखाद्या कंपनीचे शेअर आपण घेतो तेव्हा त्या कंपनीची कामगिरी कशी असेल यावर आपण जोखीम घेत असतो, म्हणजे कंपनीशी निगडित विशिष्ट जोखीम. पण थेट सेन्सेक्स किंवा निफ्टी यात गुंतवूणक केली तर ही कंपनी विशिष्ट जोखीम कमी होते. एका कंपनीच्या शेअरचा भाव खाली आला तरी इतर शेअरचे वर गेलेले असू शकतात. ‘डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग’शिवाय अशी सेन्सेक्स व निफ्टी यात गुंतवणूक करणे शक्य होते ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ म्हणजे ईटीएफच्या साहाय्याने. जसे आपण शेअरची खरेदी-विक्री करतो त्याच पद्धतीने ईटीएफचीही करू शकतो.