आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Money Mangement:एकटे पालक असाल, तर भविष्यातील गरजांसाठी विमा योजना स्वस्त उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात माझ्या जवळच्या मैत्रिणीने मला एक प्रश्न विचारला, जो आजकाल सारेच विचारतात. एखादी विमा योजना काढून कर वाचवता येईल काय? विमा योजना हा शब्द जरी ऐकला, तरी लोक नाक मुरडतात, अशी सध्या परिस्थिती आहे.
अनेक जण या गोष्टीमुळे चिंतेत असतात की, आपल्याला चुकीची विमा योजना तर दिली गेली नाही ना? माझ्या मैत्रिणीला मी उत्तर दिले की, तू विमा योजना घ्यायलाच हवी. यातून कर वाचत असेल, तर मग फारच उत्तम. असे का? माझी मैत्रीण 35-36 वर्षांची आहे. तिला एक मुलगी आहे. ती आता सध्या गृह कर्ज आणि कार लोन चुकते करतेय. दुर्दैवाने तिच्या एकट्यावर मुलीला सांभाळायची जबाबदारी आहे. त्या मुलीला वडील नाहीत. जर कोणी तुमच्यावर अवलंबून असेल, तर त्याच्या भविष्याची तरतूद करायलाच हवी आणि यावर विमा योजना हाच सर्वाेत्तम पर्याय.
आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्याचा हा सर्वात चांगला आणि स्वस्त उपाय आहे. समजा तुमचे आयुष्य संकटात सापडले किंवा नोकरीवर गंडांतर आले, तर त्याचा मुलाच्या जीवनावर परिणाम होणार नाही. त्यामुळे माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलीसाठी विमा योजना घ्यायलाच हवी. तिला टर्म इन्शुरन्स पॉलिसी योग्य ठरेल की बचतीची गुंतवणूक योजना? जर कुटुंब कमावते असेल, तर गुंतवणूकच ठीक राहील.
या प्रकारच्या कुटुंबात बचत करणे सोपे असते. अशी मंडळी जास्तीत जास्त बचत करू शकतात. माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत मला वाटते की, ती गुंतवणूक करू शकणार नाही. तिच्यासाठी हप्त्याची विमा योजना जास्त सोयीची ठरू शकेल. माझा तिला सल्ला असेल की, 15 वर्षे हप्ते भरायची तयारी असेल तरच विमा योजना घ्यावी. मध्येच विमा योजना बंद झाली, तर प्रचंड नुकसान होईल. मात्र, विमा योजनेत नेहमीच गुंतवणूक केली, तर कर वाचेलच; पण भविष्यही सुरक्षित होईल. सा-या गरजाही आपोआप पूर्ण होतील.