आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात 3.8 % बेरोजगारी; गुजरातमध्ये सर्वात कमी प्रमाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गेल्या वित्तवर्षात भारतातील बेरोजगारीचा दर 3.8 टक्के राहिला. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वाधिक कमी बेरोजगारी दर गुजरात आणि दीव-दमणचा नोंदवण्यात आला. महाराष्ट्रात गतवर्षी बेरोजगारी दर 2.8 टक्के राहिला.
श्रम ब्युरोचे महासंचालक डी. एस. कोलमकर यांनी सांगितले की, भारताचा बेरोजगारी दर अमेरिका, स्पेन आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या इतर देशांच्या तुलनेत अनेक टक्क्यांनी कमी आहे. केंद्रीय श्रम आणि बेरोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या श्रम ब्युरोने 2011-12 ची आकडेवारी जारी केली आहे. या अहवालानुसार, दीव व दमण आणि गुजरातमध्ये बेरोजगारीचा दर अनुक्रमे 0.6 व 1 टक्के आहे.
कमी बेरोजगार दराच्या यादीत छत्तीसगड आणि राजस्थान अनुक्रमे तिसºया व चौथ्या क्रमांकावर आहेत. पंजाबची महसुली स्थिती बिकट असली तरी नोकरी देण्याच्या बाबतीत या राज्याने हरियाणा, दिल्ली आणि महाराष्टाला मागे टाकले आहे. पंजाबमध्ये बेरोजगारी दर 1.8 टक्के इतका राहिला. अखिल भारतीय पातळीवर इतर सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेत हा पाचवा सर्वात कमी दर आहे. ग्रामीण-शहरी भागांत हा दर अनुक्रमे 3.4 व 5 टक्के होता. म्हणजेच ग्रामीण भागात रोजगाराचे प्रमाण कमी आहे. हरियाणात व 3.2 टक्के तर चंदिगडमध्ये तो 2.8 टक्के राहिला. कमी बेरोजगारीच्या राज्यांत हरियाणा 13 तर चंदिगड नवव्या क्रमांकावर आहे.
गुजरात 1.00
दीव-दमण 0.6
छत्तीसगड 1.2
राजस्थान 1.7
पंजाब 1.8
हरियाणा 3.2
चंदिगड 2.8
महाराष्ट्र 2.8
दिल्ली 4.8