आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजेटनंतर बाजारातील रणनीती, ऑटो सेक्टरसाठी लाभदायी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यावर्षीचे हंगामी बजेट ऑटो सेक्टरसाठी लाभदायी असले तरी अन्य क्षेत्रांबाबत तसे म्हणणे योग्य ठरणार नाही. तज्ज्ञांच्या मते, बाजारात या बजेटचा परिणाम खालीलप्रमाणे बघायला मिळू शकतो.
० ब्ल्यू ओशन कॅपिटलचे संस्थापक आणि सीईओ निपुण मेहता यांच्या मते, सामान्यपणे बजेटचा जास्त प्रभाव दिसून येत नाही. यावर्षीसुद्धा काहीसे असेच घडले आहे. वित्तमंत्र्यांनी ऑटो सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंगला चालना देण्यासाठी काही पावले उचलली. मात्र, ती अल्पायुषी आहेत. यानंतरचे सरकार ही पावले अशीच कायम ठेवेल की नाही, हे पाहणे गरजेचे आहे.
० एसपीतुलसियान डॉट कॉमचे एस.पी. तुल्स्यान यांच्या मते, गुंतवणुकीबाबतचे सरकारचे लक्ष्य पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. पीएसयू बँकांत 11,200 कोटींचे भांडवल गुंतवूनही फायदा झाला नसल्याचे दिसत आहे.
० बीएनपी पारिबाचे एमडी मनिषी राय चौधरी यांच्या मते, भांडवली वस्तूंच्या क्षेत्राला बारीकसारीक सवलतींमुळे मोठा फायदा होणार नाही. या क्षेत्राला संजीवनीसाठी चांगल्या वातावरणाची गरज आहे.
० कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजचे वरिष्ठ कार्यकारी संचालक संजीव प्रसाद यांच्या मते, सध्या बाजारात मोठे भांडवल गुंतवण्यापूर्वी गुंतवणूकदाराचे लक्ष सकारात्मक ध्येयधोरणांवर असेल. प्रत्येकाची नजर येत्या निवडणुकांवर राहील. निवडणुकीमुळे येत्या दोन महिन्यांत बाजारात तेजी येऊ शकते.