आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Government Give Concession To Information Technology For Export

निर्यातवाढीकरिता केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्राला सवलती देण्याची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्राला सवलती देण्याची गरज असल्याकडे असोचेम या उद्योग संस्थेने लक्ष वेधले आहे. जागतिक बाजारात सध्या तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत निर्यातवाढीला गती देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान उद्योगाला सवलतीचा आधार मिळणे अगत्याचे असल्याचेअसोचेमने वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

गेल्या आर्थिक वर्षात देशातील माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्राने केवळ 4.2 टक्के वाढीची नोंद केली, तर रशिया आणि फिलिपाइन्स या देशांनी अनुक्रमे 69 आणि 27 टक्के अशी भक्कम वाढ नोंदवली सध्याच्या आयात-निर्यात धोरणामध्ये वापरलेल्या मालाची आयात करण्यास बंधने असून त्यांच्या आयात परवान्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियादेखील किचकट आहे. एका अंदाजानुसार अशा प्रकारच्या मालाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 10 दशलक्ष डॉलरपेक्षा कमी आहे, परंतु काही वर्षांपूर्वी युरोपीय संघ आणि अमेरिकेमध्ये हेच प्रमाण जवळपास 20 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी विद्यमान आयात-निर्यातदारांना सवलती देणे तसेच एमएसएमई आणि निर्यातदारांना आर्थिक सवलती देण्याच्या दृष्टीने वाणिज्य मंत्रालयाने आपल्या व्यापार धोरणाचा फेररचना करावी, असे असोचेमने सुचवले आहे.


या बाबी हव्यात
० भारतात पुन्हा व्यवसाय स्थापन करणा-या किंवा आपले अस्तित्व आणखी वाढवणा-या व्यवसायांना चालना देण्यासाठी वाढीव निर्यात सवलत योजना सॉफ्टवेअर सेवा क्षेत्राकरिता लागू करावी.
० कर सवलतीचे लाभ 2011 नंतर काढून घेतल्यामुळे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाचे (एसटीपीआय) अस्तित्व हरवल्यासारखे झाले आहे. त्यासाठी नवीन माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना आकर्षित करण्याची गरज.
० आयात - निर्यात धोरणातील किचकटपणा कमी करण्यासाठी काही योजना एकत्रित कराव्यात.
० अल्प खर्चात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी धोरणामध्ये मोठे बदल करण्याची गरज.