आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Union Government Sanctioned Laon Subsidy Scheme For The Farmers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्र सरकारची शेतकर्‍यांसाठी व्याज अनुदान योजना मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शेतकर्‍यांना वाजवी दरात कर्ज उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी व्याज अनुदान योजना मंजूर केली आहे. त्यानुसार आता शेतकर्‍यांना सात टक्के सवलतीच्या व्याजदराने अल्प मुदतीचे पीक कर्ज मिळणार असल्याचे माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी सांगितले.

खासगी क्षेत्रातील वाणिज्य बॅँकांकडून घेण्यात येणार्‍या पीक कर्जांसाठीदेखील या योजनेची व्याप्ती अगोदरच वाढवली आहे. संबंधित वाणिज्य बँकांच्या सेवा क्षेत्रातून देण्यात येणार्‍या कर्जासाठी ही योजना असल्याचे तिवारी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार्‍या निर्णयाची माहिती देताना स्पष्ट केले.

कर्जाची परतफेड वेळेत करणार्‍या शेतकर्‍यांसाठी अतिरिक्त तीन टक्के व्याज सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांच्या पीक कर्जावर वार्षिक चार टक्के व्याज आकारले जाणार असल्याचेही ते म्हणाले. किसान क्रेडिट कार्ड असलेल्या लहान आणि मध्यम शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारने 7 टक्के सवलतीच्या व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणार आहे.


कृषी कर्जाचे प्रमाण वाढवणार
कृषी कर्जासाठी दिलेले लक्ष्य गाठण्याचा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने बॅँका प्रयत्न करीत आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी कृषी कर्ज वितरणासाठीचे लक्ष्य अगोदरच्या वर्षातल्या 5.75 लाख कोटी रुपयांवरून आता 7 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गेल्याच आठवड्यात अल्प मुदतीच्या कृषी कर्जाचे लक्ष्य वाढवण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. बॅँकांनी मागील वर्षात 5 लाख 75 हजार कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरण केले होते. यंदाच्या वर्षात हे कर्ज वाटप सात लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्षाच्या प्रारंभी करण्यात आला होता. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे कृषी कर्ज वितरणाचे लक्ष्य वाढवण्यात आल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.