आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्राहक ओळख क्रमांक’ अंमलबजावणीसाठी बँकांना मुदतवाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बँक ग्राहकांना एक विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड) देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंधनकारक केले आहे. परंतु काही बॅँकांना याची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅँकेने हा क्रमांक देण्याच्या प्रक्रियेला 31 मार्च 2014 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत यंदा मे महिन्यात संपणार होती. ग्राहकांबरोबर नवे नातेसंबंध जोडताना त्यांना ‘युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड’ देणे बंधनकारक केले आहे; परंतु बºयाचशा बँकांनी विविध कारणांमुळे यूसीआयसी प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याचे म्हटले आहे. विद्यमान ग्राहकांना हा क्रमांक देण्यासाठी बँकांनी थोडीशी जास्त मुदत मागितली आहे.विद्यमान ग्राहकांना यूसीआयसीचे वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बॅँकांना लागत असलेला वेळ लक्षात घेऊन या प्रक्रियेला 31 मार्च 2014 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बॅँकेने म्हटले आहे. परंतु बॅँकेशी नवीन संबंध जोडताना ग्राहकांना यूसीआयसी देणे गरजेचे आहे. सर्व बॅँकांनी मे अखेरपर्यंत सर्व ग्राहकांना यूसीआयसी क्रमांक देण्याचे आदेश बँकेने अगोदर दिले होते.