नवी दिल्ली - युनाएटेडबँक ऑफ इंडियाने किंगफिशर एअरलाइन्स आणि कंपनीचे प्रवर्तक विजय मल्ल्या यांना विलफूल डिफॉल्टर जाहीर केले आहे. कर्जाचा हप्ता चुकवल्याप्रकरणी बँकेने कंपनी तसेच मल्ल्या यांच्याविरोधात हे पाऊल उचलले आहे. बँकेचे कार्यकारी संचालक दीपक नारंग यांनी सोमवारी ही माहिती दिली.
परिणाम: किंगफिशर एअरलाइन्स आणि मल्ल्या यांना आता कोणत्याच बँकेचे कर्ज मिळणार नाही.
मल्ल्या यांना
आपल्या इतर कंपन्यांच्या कार्यकारी मंडळावरील पदे सोडावी लागण्याची शक्यता. मल्ल्यांवर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.