बिजनेस डेस्क - हॉवर्डच्या एका खोलीतून सुरू झालेल्या मार्क झुकरबर्गच्या एका प्रोग्रॅमने इंटरनेट जगतात एक वेगळीच सुरूवात केली. ही कथा आहे, मेहनत, जिद्द आणि कल्पनांची. या सर्वांचा परिणाम म्हणजे प्रचंड मोठ्ठ यश. या कथेचा हिरो काही दिवसांतच अत्यंत श्रीमंत आणि लोकप्रिय झाला. मात्र या यशाच्या शिखरावर पोहचणार्या झुकरबर्गने फेब्रूवारी 2004 मध्ये जेव्हा
फेसबुक लॉन्च केले तेव्हा त्यालाही याचा अंदाज नव्हता की, काही वर्षातच हे अॅप्लिकेशन संपूर्ण जगात एवढे लोकप्रिय होईल याचा. त्यांनी केवळ हॉवर्ड विद्यारपीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक सॉफ्टवेअर बनवले होते, मात्र त्यानंतर हळूहळू हे सॉफ्टवेअर एका विशेष सेगमेंटअंतर्गत लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. याप्रमाणे काही खास लोकांसाठी बनवलेले फेसबुक नंतर सर्वांसाठी खुले झाले.
फेसबुकचा हा जन्मदाता आज भारतात आला आहे. मार्क येथे Internet.org च्या संम्मेलनात सहभाग नोंदवण्यासाठी आले आहे. झुकरबर्ग हे अमेरिकेचे तिसरे CEO आहेत, जे मागील काही दिवसांमध्ये भारतात आले आहेत. नुकतेच अॅमेझॉनचे CEO जेफ बेझॉस आणि
मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला हे भारतात आले होते.
काय आहे Internet.Org
Internet.Org चे काम जगभरातील इंटरनेट युजर्सला स्वस्तात इंटरनेट कनेक्शन देणे आहे. या प्रकल्पात फेसबुकशिवाय एरिक्सन, मिडियाटेक,
नोकिया, ओपेरा, क्वाल-कॉम आणि
सॅमसंग यांचाही सहभाग आहे.
पुढे वाचा, विद्यापिठा्च्या एका खोलीत चार मित्रांनी बनवले होते फेसबुक...
नोटः सर्व फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी ठेवला आहे...