आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात पडझड सुरूच; सेन्सेक्स 102 अंकांनी घसरला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अपेक्षेपेक्षा जास्त राहिलेला महागाई दर आणि खुंटलेल्या औद्योगिक उत्पादन वाढीचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. बुधवारी सेन्सेक्स 101.87 अंकांनी घसरून 19,041.13 या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. निफ्टी 28.60 अंकांनी घटून 5760.20 पातळीवर स्थिरावला.


विदेशी वित्तीय संस्थांनी (एफआयआय) केलेल्या समभाग विक्रीमुळे सेन्सेक्सच्या घसरणीत भर पडली. रुपयाच्या घसरणीत झालेल्या सुधारणेमुळे बाजाराला काहीसा दिलासा मिळाला. ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, धातू, आयटी, एफएमसीजी आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांची जोरदार विक्री झाली, तर फार्मा आणि रिफायनरी क्षेत्रातील समभागांची चांगली खरेदी झाली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 20 समभाग आपटले. दर कपातीच्या आशा मावळल्याने बँकांच्या समभागांची विक्री करणे गुंतवणूकदारांनी पसंत केले.