आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Upa Government Recently Announce Wage Hights For Epfo Person

तोट्यातील कंपनीच्या कर्मचार्‍यांनाही मिळणार बोनस; वाढेल सॅलरी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 10 टक्के वाढ करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील कामगारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. खासजी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा करण्याची सरकारने तयारी केली आहे. या घोषणांची सुरुवात बुधवारपासून होण्याची शक्यता आहे.

भविष्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) खाताधारकांसाठी कमीत कमी मासिक निवृत्तीवेतन एक हजार रुपये निश्चित करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून 8.87 कोटी लाभार्थ्यांना लाभ होईल. तसेच तोट्यात असलेल्या कंपन्यांमधील नियमित कर्मचार्‍यांना वार्षिक बोनस दिल्या जाण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 10 टक्के वाढ करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून पुढील महिन्यात याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. याचा लाभ 50 लाख कर्मचारी तसेच 30 लाख निवृत्त कर्मचार्‍यांना होणार आहे. वर्षभरातील ही दुसरी वाढ असेल.

गेल्या सप्टेंबरमध्ये केंद्राने महागाई भत्ता 10 टक्के वाढवून 90 टक्के केला होता. नव्या घोषणेनंतर तो 100 टक्के होईल. सूत्रांनुसार महागाई भत्त्यातील ही वाढ 1 जानेवारीपासून लागू असेल.

पुढील स्लाइडवर वाचा, आणखी कोणत्या असतील घोषणा?