आता नवे आकर्षण / आता नवे आकर्षण ‘अ‍ॅटिट्यूड दक्षा’ टॅब्लेटचे

Apr 25,2012 11:35:10 PM IST


मुंबई - केंद्र सरकारच्या ‘आकाश-2’ टॅब्लेटला होत असलेला विलंब अन्य टॅब्लेट कंपन्यांच्या चांगलाच पथ्यावर पडला असून सध्या बाजारात स्वस्तातल्या अँड्रॉइड टॅब्लेटची धूम सुरू झाली आहे. आता टेलमोको डेव्हलपमेंट लॅब्ज या कंपनीनेदेखील ‘अ‍ॅटिट्यूड दक्षा’ हा नवा स्वस्तातला अँड्रॉइड टॅब्लेट आणला असून तो 15 मेपर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
निजेश सी. आर., आदिथ बोस आणि कल्पा राधाकृष्णन या तरुण उद्योजकांनी प्रवर्तित केलेल्या टेलमोको डेव्हलपमेंट लॅब्स या कंपनीने अ‍ॅटिट्यूड टॅब्लेट्सचे प्रकार अगोदरच बाजारात आणले आहेत. वाय - फाय सुरू राहिले तरी सहा तासांचा बॅटरी बॅकअप हे टॅब्लेटचे वेगळे वैशि ष्ट्र ्य सांगता येईल. अन्य काही कंपन्यांप्रमाणे टेलमोकोनेही शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्थांवर प्रारंभी लक्ष केंद्रित करण्याबरोबरच केंद्र सरकारच्या ‘आकाश-2’साठीदेखील प्रयत्न करण्याचा कंपनीचा विचार आहे.
‘आकाश’च्या तुलनेत चांगला, पण सॅमसंग गॅलक्स टॅब किंवा अ‍ॅपल आयपॅडपेक्षा स्वस्त अँड्रॉइड टॅब्लेटच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी अ‍ॅटिट्यूड दक्षा चांगला पर्याय ठरू शकतो. केंद्र सरकारच्या ‘आकाश-2’ टॅब्लेटला होत असलेला विलंब अन्य टॅब्लेट कंपन्यांच्या चांगलाच पथ्यावर पडला असून सध्या बाजारात स्वस्त अँड्रॉइड टॅब्लेटची धूम सुरू झाली आहे.
असा आहे अ‍ॅटिट्यूड दक्षा
वैशिष्ट्ये : कॅप्टिव्ह 5 पॉइंट टच स्क्रीन
1.2 गीगाहर्ट्झ एआरएम कॉर्टेक्स ए 8 प्रोसेसर
512 एमबी डीआरआर 3 रॅम
हायडेफिनेशन व्हिडिओ
0.3 मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा
थ्रीजी डोंगलसाठी ओटीजी कनेक्टर
किंमत : 5 हजार 399 रुपये
उपलब्ध कधी : 15 मे 2012

X