आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीएमडब्ल्यूची अत्याधुनिक सुपर सेडान लवकरच बाजारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसलिफ्ट मॉडेल
किंमत : 1.34 कोटी (अंदाजे)


फ्रोस्टी-ब्ल्यू बीएमडब्ल्यू एम 5 कार फेसलिफ्ट मॉडेल आहे. यात चौकोनी एलईडी रिंग्ज, किडनी ग्रिलपर्यंत ट्विन स्पोक थीम, मोठय़ा आकाराचे एम व्हील्स आणि ट्विक्ड टेललॅम्प्ससारखे नवे फीचर्स आहेत. हे बदल स्पष्ट दिसून येतात. अनेक बदल लवकर लक्षातही येत नाहीत.

नव्या मॉडेलमध्ये काही फीचर्स अधिकाधिक चांगले करण्यात आले आहेत. स्टॅबलायजर बार पूर्वीपेक्षा 15 टक्के जास्त मजबूत आहे. स्टेअरिंग रॅक 10 टक्के जास्त वेगवान आहे. यात डिश साइज कार्बन सिरॅमिक ब्रेक्सचा पर्याय आहे. याचे ट्विन टबरे, 4.4 लिटर व्ही 8 इंजिन ऑटोमॅटिक आहे.

केवळ 4.2 सेकंदांत कार ताशी 100 किमी वेग घेते. रिअल - व्हील कारसाठी हे विशेष फीचर आहे. ड्रायव्हिंग सीटवरून कार रुंद दिसून येते. कारचा कमाल वेग ताशी 250 किमी आहे.

फेसलिफ्ट मॉडेलमध्ये एलईडी हेडलँप, टच सेंसिटिव्ह आयड्राइव्ह कं ट्रोलर, द न्यू लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टिम, कोलिजिन वॉर्निंग सिस्टिम व नवी ऑनलाइन एंटरटेनमेंट इत्यादी पर्याय आहेत.

ही कार जुलैनंतर भारतात उपलब्ध होईल. चांगल्या साधनांमुळे कारची किंमत वाढली आहे. मात्र, जास्त पैसे मोजून बॅलिस्टिक परफॉर्मन्स, 4 -डोअर, 5 सीट्स व ऐसपैस बूट स्पेस मिळत असेल, तर कार फार महाग वाटत नाही.

ड्रायव्हिंग मोड बदलण्यासाठी केवळ बटण दाबावे लागते. कारचे वजन 1945 किलो आहे. सरळ मार्गाने कार धावत असल्यास वजनाचा अंदाज येत नाही. मात्र, निमुळत्या जागेवरून जाताना कारच्या आकाराची जाणीव होते.
बीएमडब्ल्यू एम 5 कारची अंदाजे किंमत 1.34 कोटी रुपये आहे. व्ही 8,4395 सीसी, ट्विन टबरे, पेट्रोल इंजिनने समृद्ध अशी ही कार असून काही नवी साधने देण्यात आली आहेत. यात 7 स्पीड, ड्यूएल क्लच व ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.