आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Update News: India May Face Major Power Cut As Power Station Coal Stocks Lowest Since 2012

अनेक राज्ये बुडणार अंधारात; देशातील 50% वीज केंद्राचा कोळसा संपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली - वीज क्षेत्रातील सुधारणेसंदर्भात घेण्यात आलेले सर्व निर्णय निष्फळ ठरत आहेत. कोळशाच्या कमतरतेमुळे अनेक कंन्यांना आपल्या वीज संयंत्रांना बंद करावे लागत आहे. देशातील औष्णिक उर्जा केंद्राजवळ 2012 नंतर आतापर्यंतचा सर्वात कमी कोळशाचा साठा आहे. सीईएच्या म्हणण्यानुसार, देशातील 100 पैकी 50 केंद्रात केवळ 7 दिवसांपूरता कोळसा शिल्लक आहे. जर अशा परिस्थितीत एखादे वीज संयंत्र बंद पडले तर मोदी सरकारच्या अडचणी वाढू शकतात.
एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे केंद्रीय विद्यूत नियामक आयोगाने अदानी पॉवर आणि कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडला विजेच्या किंमती वाढवण्याची सुट देण्याचे ठरवले आहे. सुट मिळाल्यानंतर अदानी पॉवर आणि टाटा पॉवरने त्यांचे काही विद्यूत केंद्रे बंद केली आहेत. यापूर्वी देशातील विद्यूत क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एनटीपीसीने कोळशाच्या कमतरतेमुळे त्यांची विद्यूत केंद्रे बंद केली होती.

किती राज्यातील वीज जाऊ शकते
पश्चिम विभागातील लोड डिस्पॅच सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम विभाग ग्रीडला 26 ऑगस्टला विद्यूत केंद्रात कोळशाच्या कमतरतेमुळे 3143 मेगावॅटचे नुकसान सहन करावे लागले होते. या ग्रीडची एकूण क्षमता जवळपास 4550 मेगावॅट एवढी आहे आणि या ग्रीड अंतर्गत गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा, दमन दीव आणि नागरा हवेली हे राज्य येतात.

टाटा पॉवरची पूर्ण अनुषंगी कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, यूएमपीपीच्या दुसरे आणि चौथे संयंत्र वेगवेगळ्या कारणांनी बंद आहेत. ही विद्यूत केंद्रे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबला विद्यूत पुरवठा करतात. तर अडाणी पॉवरचा विज पुरवठा गुजरात आणि हरियाणाला होतो.

कोणकोणती विद्यूत केंद्रे बंद झाली आहेत
ज्या विद्यूत केंद्रामधील विज नि्र्मिती बंद झाली आहे, त्यामध्ये अदानी आणि टाटाची मुंदडा परियोजनेची काही विद्यूत केंद्रे बंद झाली आहेत. विशेष म्हणजे देशातील अनेक औष्णिक विद्यूत केंद्रामध्ये कोळशाची कमतरता पूर्वीपासूनच आहे. या केंद्राच्या एकूण क्षमतेपेक्षा 34000 मेगावॅट कमी विज निर्मिती होत आहे. अदानी पॉवरने मुंदडा, गुजरातमध्ये त्यांच्या 4620 मेगावॅटच्या विद्यूत निर्मिती केंद्रातील जवळपास सहा संयंत्रे बंद केली आहेत.