आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Update Xiaomi Mi3 Sales Is Discontinued In India For The Time Being

Xiaomi ने भारतात बंद केली Mi3 ची विक्री, आता करणार Mi4 लॉन्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Xiaomi Mi 3)
गॅजेट डेस्क - Xiaomi Mi3 च्या नव्या स्टॉकची वाट पाहणार्‍यांसाठी एक वाईट बातमी आहे. चीनीच्या या प्रसिध्द कंपनीने भारतातील Mi 3 ची विक्री थांबवली आहे. आतापर्यंत भारतात Mi 3 चे 96000 स्मार्टफोन्स विकले गेले आहेत.

techpp.com च्या अहवालानुसार, Xiaomi चे भारताचे मुख्य मनु शर्मा म्हणाले की, Redmi 1s ची विक्री वाढवण्यासाठी कंपनीने हा नि्र्णय घेतला आहे. सध्या तरी Xiaomi Mi3 चा पुढील स्टॉक कधी येणार आहे याबद्दल काहीच माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीने नुकतेच त्यांचा लो-बजेट स्मार्टफोन Redmi 1s नुकताच भारतात लॉन्च केला आहे. या मोबाईलची पहिली फ्लॅश विक्री 2 सप्टेंबरला होणार आहे. हा फोन फ्लिपकार्ट या वेबसाईटवरून विकत घेता येईल.
काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्टच्या एक्सक्लूसिव्ह स्ट्रेटजीबद्दल Xiaomi चे ग्लोबल प्रेसिडेंड हुगो बारा यांच्यावर टिका करण्यात आली होती. फ्लिपकार्टच्या एक्सक्लूसिव्ह स्ट्रॅटेजीमुळे Mi3 ची विक्री ब्लॅकमध्ये होत होती.
Redmi 1s शिवाय कंपनी भारतात अजून एक स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Xiaomi दिवाळीदरम्यान भारतात Mi3 चीच पुढील आवृत्ती मेटॅलिक बॉडी असलेला Mi4 लॉन्च करणार आहे. Mi3 ची भारतातील विक्री थांबवण्याच्या पाठीमागे हेसुध्दा एक कारण असू शकते. Mi 4 साठी कंपनी भारतात मोठे मार्केट उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, Xiaomi Mi4 चे फिचर्स...