आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात तेजी-मंदीचा खेळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई शेअर बाजारात मंगळवारी तेजी-मंदीचा खेळ ऊन-पावसाच्या खेळाप्रमाणे रंगला. एकवेळ 260 अंकांच्या कमाईसह सेन्सेक्सने उच्चांक गाठला होता. मात्र, शेवटच्या सत्रात झालेल्या नफेखोरीमुळे निर्देशांकाने कमाई गमावली. दिवसअखेर सेन्सेक्स 88 अंकांच्या वाढीसह 18,629.15 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18.85 अंकांच्या कमाईसह 5609.10 वर स्थिरावला. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली रुपयाची घसरण मंगळवारी थांबली. डॉलरच्या तुलनेत रुपयाने दोन पैसे कमावत 56.66 ही पातळी गाठली.


भारती एअरटेल, ओएनजीसी आणि महिंद्रा अँड महिंद्रा या ब्ल्यूचिप समभागांच्या चमकदार कामगिरीने तेजीला बळ आले. त्यातच युरोपातील प्रमुख बाजारांतील तेजीच्या कलाने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला. येणा-या दोन सत्रांत बाजारात अस्थैर्याचे वातावरण राहील असे मत ब्रोकर्सनी व्यक्त केले. बोनान्झा पोर्टफोलिओच्या वरिष्ठ विश्लेषक निधी सारस्वत यांनी सांगितले, मिडकॅप आणि धातू कंपन्यांच्या समभागांची विक्री सुरूच राहील. काहीशी तेजी दिसून आली तरी एकूणच नकारात्मक वातावरण राहण्याची शक्यता जास्त आहे.