आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी सेवा परीक्षेवर प्रतियोगिता दर्पणचा विशेष अंक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा - केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी प्रतियोगिता दर्पण मासिकाचा एप्रिल महिन्याचा अंक दाखल झाला आहे. हा अंक अनुभवी शिक्षकांनी तयार केला आहे. नागरी सेवा, स्टाफ सिलेक्शन, बँक पीओ, यूजीसी नेट आणि इतर अन्य परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हा अंक उपयुक्त असल्याचे या मासिकाचे संपादक व प्रकाशक महेंद्र सिंह यांनी सांगितले.

ते म्हणाले, या विशेष अंकात केंद्राचा हंगामी अर्थसंकल्प तसेच रेल्वे अर्थसंकल्प संक्षिप्त स्वरूपात देण्यात आला आहे. चालू घडामोडी तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील दर्जेदार लेख आहेत. तसेच सिव्हिल सर्व्हिसेस (मुख्य) परीक्षा 2013, यूजीसी नेट/ जेआरएफ 2013 या परीक्षांतील सोडवलेल्या प्रश्नपत्रिका या अंकात देण्यात आल्या आहेत.