आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणीबाणीच्या परिस्थितीतही स्वस्त दरात कर्जाचा पर्याय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्वरित आणि विनातारण कर्ज घेण्याचा एकच मार्ग शिल्लक राहतो, तो बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचा. मात्र, त्याचे व्याजदर 15 टक्क्यांपेक्षा जास्त असतात. त्यामुळे हा व्यवहार महाग पडतो. अचानक निर्माण झालेल्या आर्थिक संकटात कोणालाही पैशाची गरज पडू शकते. पर्सनल लोन हा एक सोपा पण महाग पर्याय आहे. थोडेसे धाडस आणि चातुर्याने काम केले तर कमी व्याजदरात आणि अपेक्षेपेक्षा कमी काळात जरुरीपुरत्या रकमेची व्यवस्था होऊ शकते. तुम्हाला एखाद्या आठवड्याच्या आत पैशाची गरज पडली आणि बचत खात्यात तितकी रक्कम नसेल तर तुम्ही काय कराल? त्वरित आणि विनातारण कर्ज घेण्याचा एकच मार्ग शिल्लक राहतो, तो बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचा. मात्र, त्याचे व्याजदर 15 टक्क्यांपेक्षा जास्त असतात. त्यामुळे हा व्यवहार महाग पडतो.
सोने तारण कर्ज - ज्यांच्याकडे सोने नाही अशी कु टुंबे कमी असतात. त्यामुळे गरज पडल्यास सोने तारण ठेवून त्वरित कर्ज मिळू शकते. यास कालावधीही अगदी तास-दोन तासांचा लागतो. याचे व्याजदरही कमी असतात. सोन्याच्या तारणावर दिल्या जाणाºया कर्जाचे व्याजदर 11.75 ते 17 टक्क्यांदरम्यान असतात. मोठ्या बँका, मणप्पुरम गोल्ड, मुथुट फायनान्स इत्यादी सोन्याच्या बदल्यात कर्ज उपलब्ध करून देतात. या कर्जाची फेड मासिक हप्त्याने करण्याचीही गरज नसते.
मुदत ठेवीवर कर्ज - पैशाची गरज पडल्यानंतर सोन्याच्या पर्यायानंतर मुदत ठेवीवर कर्ज घेणे कधीही सोपे जाते. मात्र, यासाठी मुदत ठेव कमीत कमी एक वर्षासाठी असली पाहिजे. याचीही कारवाई लगेच होते. मुदत ठेवीच्या 80 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते. शिवाय व्याजदर मुदत ठेवीसाठी असलेल्या व्याजापेक्षा दोन टक्क्यांनी जास्त असतो. याचीही फेड ठेवीची मुदत संपताना केली तर चालते.
इंडोमेंट पॉलिसीवर कर्ज - जीवन विमा योजनेच्या किंवा इंडोमेंट पॉलिसीवर अगदी तातडीने कर्ज मिळू शकते. अशा पॉलिसीच्या तारणावर मिळालेले कर्ज सिक्युर्ड स्वरूपातील मानले जाते. कर्जाचा व्याजदरही पर्सनल लोनच्या तुलनेत बेस रेटच्या तीन टक्के जास्त असतो. कर्जाची रक्कम सरेंडर व्हॅल्यूवर अवलंबून असते. याच्या प्रोसेसिंगला तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो.
शेअर, म्युच्युअल फंडाच्या बदल्यात कर्ज - गरज भासल्यास शेअर्स किंवा म्युच्युअल फंडाच्या बदल्यात कर्ज मिळू शकते. त्यांचे व्याजदर पर्सनल लोनच्या तुलनेत कमीच असतात. यासाठी स्वत:चे ओळखपत्र, राहत्या ठिकाणाचा पत्ता, त्याचा पुरावा (लाइट बिल वगैरे), ट्रान्सफर डीड, डीमॅट प्लेज फार्म इत्यादी कागदपत्रे लागतात. यासाठी शेअर्स, म्युच्युअल फंड बँकांच्या नावाने करावी लागतात. मात्र, सर्वच शेअर्सवर कर्ज मिळतेच असे नाही. शिवाय शेअर्सचे सध्याचे मूल्य जितके असेल त्याच्या 60 ते 70 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते.
मालमत्तेच्या तारणावर कर्ज - मालमत्तेच्या तारणावर कर्ज मिळू शकते. कर्जाची रक्कम तारण ठेवल्या जाणाºया मालमत्तेचे मूल्य आणि कर्जदाराचे वार्षिक उत्पन्न यावर अवलंबून असते. या कर्जाचा विनियोग मुलांची लग्ने, त्यांचे उच्च शिक्षण, व्यवसायवाढीसाठी किंवा दवाखान्याचा मोठा खर्च भागवण्यासाठी करता येतो. असे कर्ज सुरक्षित मानले जात असल्याने त्याचे व्याजदर 12 ते 15 टक्क्यांपर्यंत असतात.
शेतक-यांसाठी खास कर्ज- भारतीय स्टेट बँकेने फार्म गोल्डलोन या नावाने शेतकºयांसाठी स्वस्त कर्जाचा पर्याय ठेवला आहे. बँक शेतकºयांच्या सोन्याच्या किमतीच्या 80 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. केंद्र सरकार इंट्रेस्ट सबव्हेन्शन स्कीमअंतर्गत बँकेला हे कर्ज 7 टक्के दराने देते. शेतकºयाने कर्जाची फेड वेळेत केली तर बँक त्यांना 3 टक्क्यांची सबसिडी देते. त्यामुळे शेतकºयांना चार टक्के व्याजाने कर्ज मिळते.