आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या राजदूत मुख्यमंत्र्यांना भेटल्या, पॉवेल यांच्याकडून डीएमआयसीची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतातील अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. नॅन्सी पॉवेल या मेअखेर निवृत्त होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अजिंठा येथील महापद्मपाणिंची प्रतिकृती त्यांना दिली.
महाराष्ट्र सरकारने येथील वाणिज्यदूत कार्यालयास त्याच प्रमाणे अमेरिकन वकिलातीच्या विविध उपक्रमांना नेहमीच सहकार्य केले आहे, पुढेदेखील ते सुरूच राहील, अशी आशा पॉवेल यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली.