आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेकंड हँड कार खरेदीत कॉमनसेन्स महत्त्वाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक जण मला नेहमी विचारतात की, ही फलानी कार सेकंड हँड घेण्यासाठी कशी राहील? तिच्या देखभालीसाठी जास्त खर्च येईल का? काही जण एवढेच विचारतात की, ही कार पाच वर्षे चालेल का? मला माहिती आहे की काही जण प्रत्येक शक्यता पडताळून पाहतात. दोन ते तीन टेस्ट ड्राइव्ह घेतात तरीही समाधान होत नाही. माझा सल्ला घेतल्यानंतरही अनेक जण आपल्या र्मजीची कार खरेदी करतात. याचे मला नेहमीच आश्चर्य वाटते. सेकंड हँड कारची खरेदी हा नशिबाचा भाग आहे की पूर्ण माहितीअंती घेतलेला निर्णय ?

काही जणांनी सेकंड हँड मार्केटमधून कार खरेदीसाठी काही नियम बनवले आहेत. हे नियमही पाहा आणि इतरांकडून मिळणारी माहितीही घ्या. म्हणजे नुसती माहितीच माहिती. तरीही नियमांची ऐशीतैशी तर होतेच, शिवाय माहितीकडे दुर्लक्ष तरी होते. काही महिन्यांपूर्वी मीही सेकंड हँड कार खरेदी केली. सर्व प्रकारची दक्षता बाळगली. तरीही तीन महिन्यांनंतर इलेक्ट्रिकलसंबंधी समस्या आढळून आली. मला ती दुरुस्त करावी लागली. त्यापूर्वी कार खराब होईल, असे माझ्या मनातही आले नव्हते. अशी स्थिती म्हणजे घ्या किंवा सोडून द्या, अशी आहे. जे ठीक वाटते ते करा. सेकंड हँड कारच्या वाबतीत काही वर्षांनंतर ती योग्य स्थितीत राहणे हा नशिबाचाच भाग असल्याचे मी मानतो. अशा स्थितीत मी केवळ अंदाजावर भर देतो.

सेकंड हँड कारच्या खरेदीत 90 टक्के कॉमनसेन्स आणि 10 टक्के नशिबाचा भाग असतो. कॉमनसेन्सद्वारे आपण कार पाहतो. तसेच त्या कारचा इतिहास, एक्सल, टायर आणि कार कोण विक्री करतो आहे अशा बाबींवर भर देतो. अशा स्थितीत तुम्ही अहंकारी राहणे उत्तम. गेल्या काही वर्षांपासून मी सेकंड हँड कार खरेदी करतो. त्यात हे समीकरण मला अत्यंत उपयुक्त ठरले आहे.

मी कार खरेदी करताना कधीच तिच्या बॉनेटवर स्टेथोस्कोप लावला नाही. एग्झॉस्ट ओढून किंवा टायरवर जोरात लाथा मारून पाहिले नाही. असे करण्याची काहीच गरज नाही. कारमधून निघणारा धूर, ग्राइंडिंगचा आवाज तसेच मागचे दरवाजे याकडे लक्ष दिले नाही तरी फारसा फरक पडत नाही.

कोणतीही कार खरेदी करतेवेळी सर्वात महत्त्वाचे असते ती नवी आहे की जुनी. यात केवळ हाच फरक अत्यंत महत्त्वाचा आहे.

लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.
kabeer.mahajan@dainikbhaskargroup.com