आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: रॉयल्‍टी फ्री संगीत ऐकण्‍यासाठी उपयुक्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.luckstock.com: लकस्टॉक डॉट कॉम वेबसाइटवर यूट्यूब, जाहिरात, टीव्ही, ब्रॉडकॉस्टिंग आणि व्यावसायिक कार्यक्रमासाठी रॉयल्टी फ्री संगीत आणि ऑडियो सुविधा मिळते. या वेबसाइटच्या मदतीने तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक, लोगो साऊंड आणि साऊंड इफ्केट खरेदी सुद्धा करता येतात. जगभरातील संगीतकार आणि खरेदीदारांना कल्पनात्मक कलाकृती तयार करण्यासाठी लागणार्‍या संगीत आणि इतर साहित्याची बाजारपेठ निर्माण करणे हा या साइटचा उद्देश आहे.

येथे खरेदीदाराला रॉयल्टी फ्री संगीत आणि संगीताची मोठी श्रेणी उपलब्ध आहे. ज्याचा वापर टीव्ही, रेडिओ, ऑनलाइन व्हिडिओ, वेबसाइट प्रेझेंटेशन, प्रोमोसाठी करता येतो. लकस्टॉक डॉटकॉमवर एकदा पैसे भरुन तुम्ही कायम येथील संगीताचा वापर करू शकता. संगीतकारांसाठी सुद्धा हे एक चांगले व्यासपीठ आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वत:चे संगीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकू शकता.