आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सप्लिमेंटरी क्रेडिट कार्डची उपयुक्तता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वीच्या काळी कर्ज घेणे अत्यंत वाईट मानले जायचे. मात्र, क्रेडिट कार्ड चलनात आल्यापासून कर्जाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आता मूळ कार्डबरोबरच बँका ग्राहकांना सप्लिमेंटरी किंवा अ‍ॅड ऑन कार्डही देत आहेत. मूळ किंवा प्रायमरी क्रेडिट कार्डवर मिळणारे एक अतिरिक्त किंवा पुरवणी कार्ड म्हणजे सप्लिमेंटरी कार्ड होय. प्रायमरी किंवा मूळ कार्डसह ते कुटुंबातील सदस्य जसे माता-पिता, पत्नी किंवा 18 वर्षांवरील मुला-मुलींना देण्यात येते. एका मूळ कार्डवर सप्लिमेंटरी कार्ड देण्याची प्रत्येक बँकेची मर्यादा वेगवेगळी आहे.


फायदा काय
क्रेडिट कार्ड आणि सप्लिमेंटरी कार्डची वैशिष्ट्ये एकसारखीच असतात. मात्र बँकांच्या मते काही बाबी त्यात वेगवेगळ्या असतात. सप्लिमेंटरी कार्डचे काही फायदे असे :
० वापर : बहुतांश क्रेडिट कार्ड देश तसेच विदेशात सप्लिमेंटरी कार्डवर समान लाभ देत असतात. समजा अ‍ॅड ऑन कार्ड असेल तर त्यावरून ऑनलाइनच नव्हे तर ऑफलाइन खरेदीही करता येते.
० एटीएम सुविधा : सप्लिमेंटरी कार्डचा वापर करून एटीएममधून केव्हाही पैसे काढता येतात. मूळ कार्डप्रमाणे किंवा त्यापेक्षा कमी विड्रॉल मर्यादा असते.
० रिवॉर्ड पॉइंट्स : मूळ कार्ड स्वाइप केल्यानंतर ज्याप्रमाणे रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात, त्याचप्रमाणे सप्लिमेंटरी कार्ड स्वाइप केल्यानंतरही पॉइंट्स मिळतात. ठरावीक बोनस किंवा रिवॉर्ड पॉइंट्स जमा झाल्यानंतर बँकेकडून काही लाभ मिळतो.
० मॉनिटर वापर : समजा सप्लिमेंटरी कार्ड आपल्या पाल्याला द्यायचे असेल तर त्याद्वारे होणा-या खर्चावर नियंत्रण ठेवता येते.
० सुलभ ट्रॅकिंग : मूळ कार्डच्या स्टेटमेंटमध्येच सप्लिमेंटरी कार्डद्वारे करण्यात आलेल्या व्यवहारांची नोंद होते. दोन्ही कार्डांची माहिती एकत्रच मिळत असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवणे सुलभ जाते.
० सप्लिमेंटरी कार्डची कार्य पद्धत : आपल्या नावे जितकी सप्लिमेंटरी कार्ड्स देण्यात आलेली आहेत, त्याद्वारे खर्च करण्यात आलेला पैसा आपल्या प्रायमरी खात्यातूनच घेतला जातो. सप्लिमेंटरी कार्डची मर्यादा आणि सविस्तर माहिती अशी -
० क्रेडिट लिमिट : बहुतेक सप्लिमेंटरी कार्डच्या बाबतीत मूळ कार्डप्रमाणेच क्रेडिट लिमिट असते. काही बँकांच्या बाबतीत ही मर्यादा काही प्रमाणात कमी असू शकते. उदाहरणार्थ, समजा एखाद्याला चार क्रेडिट काडर्स देण्यात आली आहेत आणि मर्यादा एक लाख रुपये आहे, तर प्रत्येक कार्डवर समान सबलिमिट देण्यात येते. म्हणजेच प्रत्येक कार्डवर प्रत्येकी 25 हजार रुपयांची सबलिमिट मिळते.
० डिटेल्स : सर्व सप्लिमेंटरी कार्डद्वारे होणा-या व्यवहाराची नोंद मूळ खात्यात होते. समजा आपल्या न कमावत्या मुलाला हे कार्ड दिले तर त्याद्वारे होणा-या प्रत्येक व्यवहारावर तारखेनिहाय नजर ठेवता येते.
० खर्च : बहुतेक वेळा प्रायमरी कार्डसोबत सप्लिमेंटरी कार्ड मोफत दिले जाते. मात्र, काही वेळा यासाठी नाममात्र शुल्क द्यावे लागते.
सप्लिमेंटरी कार्डद्वारे होणारा खर्च आणि भरणा रक्कम प्रायमरी खात्यातून जातो. त्यामुळे भरणा तारखा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण हा खर्च आणि भरणा, विलंब शुल्क आदी प्रायमरी कार्डधारकाला भरावे लागतात. त्यामुळे सप्लिमेंटरी कार्ड नेहमी विश्वासातील व्यक्तीकडे द्यावे.


लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.