आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaishnodevi Dairy Launches Shubi Milk On Gudi Padwa

पाडव्‍याच्‍या मुहूर्तावर लॉंच होणार वैष्‍णोदेवी डेअरीचे 'शुभी' दूध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दुध व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर पाच वर्षापूर्वी पाच लाख रुपये भांडवलावर सुरु केलेला दुग्धजन्य पदार्थांची उलाढाल १२ कोटी रुपयांवरून दीडशे कोटींवर नेणारी वैष्णोदेवी डेअरी प्रोडक्ट उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर शुभी हा दुधाचा स्वस्तातील पर्याय उपलब्ध करून देत आहे.

प्रती लिटर ३४ रुपये दराने हे दुध विकले जाणार असून प्रथम पुणे आणि ठाणे महापालिका क्षेत्रात ते मिळेल असे कंपनीचे अध्यक्ष नंदकिशोर अट्टल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. अट्टल हे मुळचे हैदराबादचे आहेत. पुणे जिल्ह्यातील नांदूर येथे त्यांनी २५ कोटी रुपये गुंतवून प्रकल्प उभारला असून मदर डेअरीला सध्या पुरवठा केला जातो. तसेच मदर डेअरीसाठी पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या मिल्क ट्रेनमध्ये ४ हजार लिटरचे दोन कंटेनर वैष्णोदेवी चे आहेत असे त्यांनी नमूद केले. मे आणि जून महिन्यात दही आणि पनीर शुभी नावाने बाजारात आणले जाणार आहे. अशी माहिती देऊन ते म्हणाले की, गाय आणि म्हशीच्या दुधाचे कमी चरबी असलेले मिश्रण आम्ही बाजारात आणले आहे. म्हशीच्या दुधातील अनावश्यक चरबीचे प्रमाण कमी केले आहे आणि ते प्रकृतीसाठी चांगले आहे. पहिल्या टप्प्यात २0 हजार लिटर पुरवठा केला जाणार असून येत्या काही महिन्यात ते प्रमाण पन्नास हजार लिटर होणार आहे. सध्या कंपनीचे नाव पहिल्या दहामध्ये असून ते पहिल्या पाचात जाईल. लवकरच आईस्क्रीम बाजारात आम्ही उतरणार आहोत. ब्रिटानिया कंपनीला ३0 टन तुपही पुरविले जाते. प्रकल्प विस्तारासाठी आणखी २५ कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत.

कंपनीतर्फे नांदूरनजीक रुग्णवाहिका पुरविली जाते. विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग सुविधा लवकरच दिली जाणार आहे. त्रिकुटा अग्रो या सहयोगी कंपनीतर्फे दुध संकलन केंद्रे दौंड तालुक्यात चालविली जातात, त्याचा शेतकरी वर्गाला फायदा होतो असेही त्यांनी सांगितले.