आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Varanasi Youth Started A Govt Job Website After Leaving Fat Salary Job

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

18 लाखांचे पॅकेज सोडून सुरु केली वेबसाईट, आता 1 कोटी आहे टर्नओव्हर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 फेब्रुवारी 2004 रोजी मार्क झुकरबर्ग याने फेसबुक लॉंच केले. त्यावेळी या वेबसाईटचे स्वरुप फारच लोकल होते. आता त्याला जागतीक स्वरुप आले असून अब्जावधी रुपयांचा टर्नओव्हर झाला आहे. मार्कच्या पावलावर पाऊल ठेवत भारताच्या अशाच एका मार्कने मलेशियात 18 लाखांचे पॅकेज असलेली नोकरी सोडली. भारतात परतून सरकारी नोकऱ्यांची माहिती देणारी वेबसाईट सुरु केली. विशेष म्हणजे वाराणसी येथून ही वेबसाईट हॅंडल केली जाते. आता या वेबसाईटचा टर्नओव्हर आहे तब्बल एक कोटी रुपये.
या युवकाचे नाव अर्पित सेठ असे आहे. त्याने sarkariexam.com ही वेबसाईट लॉंच केली आहे. यावर सरकारी नोकऱ्यांची सविस्तर माहिती दिली जाते. नोकरीसाठी अर्ज करण्याचा सोपा पर्याय आणि जॉबसंदर्भात मार्गदर्शनही केले जाते.
अर्पितने टाटा कंपनीतून आपल्या करिअरची सुरवात केली होती. त्यानंतर त्याला आयगेट या कंपनीकडून 18 लाखांचे पॅकेज ऑफर करण्यात आले. यासाठी तो मलेशियाला गेला. दीड वर्ष काम केले. पण या कामात मन रमत नव्हते. दुसरीकडे वडील शारीरिक सक्षम नसल्याने त्याला मायदेशी बोलवत होते. अखेर तो नोकरी सोडून मायदेशी परतला.
अशी झाली सुरवात
अर्पित सांगतो, की सध्याच्या स्पर्धात्मक युगात सगळे इंटरनेटचा वापर करतात. सगळे ऑनलाईनशी जुळलेले आहेत. अशा वेळी मला बेरोजगारांना आणि खासगी क्षेत्रात काम करीत असलेल्या युवकांना सरकारी नोकरीचे पर्याय ऑनलाईन उपलब्ध करुन द्यायचे होते. त्यानंतर तशी वेबसाईट तयार केली. तिला अपडेट करण्याची जबाबदारी पत्नी श्वेताला दिली. या प्रोजेक्टवर बीएचयू आयआयटीचे दहा विद्यार्थी काम करीत आहेत.
अशी लागली अचिव्हमेंट्सची रांग... गुंतवणुकीसाठी विदेशी कंपन्या झाल्या तयार... वाचा पुढील स्लाईडवर...