आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक कॅशसाठी विविध कंपन्या सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी प्रत्येक क्रिकेटप्रेमी आसुसला आहे. क्रिकेट जगताचा हा आनंद ‘कॅश’ करण्याठी कंपन्याही कुठे मागे नाहीत. स्पर्धेच्या कालावधीत ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी नाना प्रकारच्या ऑफर्स आिण उत्पादनांची बरसात कंपन्यांनी केली आहे. त्यातही सामन्यांची मजा लुटा थेट ‘हाय डेफ‍िफनेशन’ टीव्हीवर असा सूर आळवत टाटा स्काय आणि डिश टीव्हीसारख्या ‘डीटूएच’ आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. एलजी आणि पॅनासोनिक या दोन्ही कंपन्यांनी ‘रिप्लेसमेंट मार्केट’वर भर देताना ग्राहकांचे जुन्या ‘सीआरटीव्ही’कडून ‘पॅनल’ टीव्हीकडे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

लाइव्ह मॅचबरोबरच स्वच्छता अभियानही : ह्युंदाई मोटार कंपनीने मुंबईतल्या घाटकोपर येथील आर सिटीमध्ये खास ह्युंदाई आयसीसी फॅन पार्क तयार केला आहे. या ठिकाणी एका भव्य स्क्रीनवर १५ फेब्रुवारीला ‘भारत आणि पाकिस्तान’मधील रंगत अनुभवता येईल. लाइव्ह मॅचनंतर स्वच्छ भारत अभियान राबवण्याची कल्पना राबवण्यात येणार आहे.
फोर के सेट टॉप बॉक्सचा नवा आनंद : फोर के लगा डाला तो क्रिकेट झिंगालाला असे म्हणत टाटा स्कायने फोर केच्या सुस्पष्टतेसह पाहण्यासाठी फोर के सेट टॉप बॉक्स ६,४०० रुपयांत तर नवीन ग्राहकांना ५,९०० रुपयांना मिळणार आहे.

अनेक उत्पादने मोफत
*एअरटेल देणार डिस्काउंट कुपन, मोफत सबस्क्रिप्शन : सॅमसंग कर्व्ह आणि यूएचडी टीव्ही घेणा-या सर्व ग्राहकांना एअरटेल डिजिटल टीव्हीतर्फे एचडी कनेक्शनच्या किमतीत एचडी डीव्हीआर कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्व ग्राहकांना २६५० रुपयांची डिस्काउंट कुपन्स मिळणार आहेत. स्क्रॅच कार्ड ऑफरद्वारे १२ महिन्यांपर्यंतचे मोफत सबस्क्रिप्शन, ‘एचडी प्लस’वर ६६० रुपयांचे डिस्काउंट कुपन, ३९९ रुपये किमतीचा ८ जीबीचा एक पेनड्राइव्ह मोफत, सॅमसंग स्मार्ट डायरेक्ट टीव्हीजवरचे अॅक्टिव्हेशन चार्जेस पूर्णतः माफ यासारख्या सुविधा देऊ केल्या आहेत.

*एलजीची ऑडिओ उत्पादने मोफत : एलजी इलेक्ट्रॉनिक्सने मोफत ऑडिओ उत्पादने, स्क्रॅच कार्ड, कॅश बॅकसारख्या सुविधा देऊ केल्या आहेत. त्यातूनही हाय एंड अल्ट्रा एचडी आणि ओएलइडी टीव्हीवर विशेष भर दिला आहे.

*‘वर्ल्ड कप’च्या वस्तू ग्राहकांना भुलवणार : वर्ल्डकपच्या निमित्ताने टोप्या, टी- शर्ट, कॉफी मग, रिस्ट बँड्स अशा एक ना अनेक वस्तू बाजारात आल्या आहेत. हायपरसिटी रिटेलमध्ये या खास वर्ल्डकपसाठी बनवलेल्या मर्चंडाइज वस्तू ९९ रुपयांपासून ९९९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.