आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्थिर परताव्याच्या 26 योजनांसाठी फंडांची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कमीत कमी जोखीम आणि अल्प मुदतीत चांगला परतावा मिळावा असे प्रत्येक गुंतवणूकदाराला वाटत असते. नेमक्या याच गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी म्युच्युअल फंड कंपन्यांकडून किमान 25 नवीन फिक्स मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) आणण्याची तयारी झाली आहे. या नव्या योजनांचा मसुदा भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या न्यू फंड ऑफर्सच्या योजनांचा मसुदा म्युच्युअल फंड कंपन्यांनी जुलैपासूनच सादर केला आहे. बाजार नियंत्रकांकडून आवश्यक त्या मंजुर्‍या मिळाल्यानंतर या योजना बाजारात येतील. जवळपास 16 योजनांचा मसुदा ऑगस्टमध्ये तर 10 योजनांचा मसुदा जुलै महिन्यात सादर करण्यात आला आहे.

या कंपन्या आणतायेत एफएमपी आणि ‘एफटीपी’ योजना : एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, एल अँड टी, पिअरलेस, आयडीएफसी, कोटक, आयडीबीआय, बडोदा पायोनिअर, रेलिगेअर.

फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनअंतर्गत न्यू फंड ऑफर : एलआयसी नोमुरा, जे.पी. मॉर्गन, बिर्ला सन लाइफ.


योजना नेमकी काय
0 ‘फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन’ योजनेअंतर्गत कंपन्यांकडून आणण्यात आलेली बँकांची ठेव प्रमाणपत्रे तसेच व्यापारी ठेव पत्र यासारख्या साधनांमध्ये काही विशिष्ट कालावधीसाठी गुंतवणूक करण्यात येते.
0 या योजनेचा कालावधी साधारणपणे काही महिने किंवा एक वर्ष असतो.
0 या योजनांनी गेल्या काही महिन्यांत सरासरी 10 ते 11 टक्के परतावा दिला आहे.

चांगल्या परताव्यासाठी उत्तम पर्याय
भांडवल बाजाराचा सध्याचा लहरी स्वभाव बघता फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स आणि शॉर्ट टर्म फंडातील गुंतवणूक हा गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण अल्पमुदतीच्या व्याजदरामध्ये अलीकडच्या काही महिन्यांमध्ये जवळपास 200 ते 300 बेसिस पॉइंटने वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. संजय चांदेल, सीईओ, इंडियाबुल्स म्युच्युअल फंड.