आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasudha Kamat News In Marathi, SNDT Vice Chancellor, Divya Marathi

‘आम्ही उद्योगिनी’ने महिलांना द्यावा सशक्तपणाचा मंत्र , डॉ. वसुधा कामत यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नोकरी क्षेत्र आकुंचन पावत चालल्याने उद्योग क्षेत्राचा विस्तार होत आहे. पण तिथे पुरुषांची मक्तेदारी असल्याने महिलांना सशक्त करण्याची जबाबदारी ‘आम्ही उद्योगिनी’ने घ्यावी, अशी अपेक्षा ‘एसएनडीटी’ च्या प्राचार्य डॉ. वसुधा कामत यांनी राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत व्यक्त केली.


‘आम्ही उद्योगिनी’ या विशेषांकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. वसुधा कामत आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते करण्यात आले. अनुया म्हैसकर, माया परांजपे, मेधा गाडगीळ आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी आयोजित महिला उद्योजक परिषदेचे पद्मविभूषण शोभनाताई रानडे व खासदार भारतकुमार राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी प्रास्ताविक केले.