आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षाला 2 लाख कोटींची नासाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सध्या कांद्यासह फळे, भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे त्याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त व्यक्त होत आहे. फळे, भाजी उत्पादनात चीननंतर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे, परंतु पुरेशा प्रमाणात साठवणक्षमता तसेच शीतकरण यंत्रणा (कोल्ड स्टोरेज) नसल्याने देशात वर्षाला सुमारे दोन लाख 13 हजार कोटी रुपयांची फळे, भाजीपाल्याची नासाडी सोसावी लागत आहे. 2013 - 14 मध्ये हा आकडा 2.50 हजार कोटींवर जाण्याचा अंदाज आहे, असे असोचेमच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात उत्पादित होत असलेल्या फळे, भाजीपाल्यापैकी सरासरी 30 टक्के वस्तू खराब होतात. त्यांचा उपयोग करता येत नाही. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याची नासाडी होण्याचे मुख्य कारण अन्न व प्रक्रिया उद्योगांची सोय नसणे तसेच देशात आधुनिक कोल्ड स्टोरेज नसणे हे आहे. अहवालात नुकसानीचा अंदाज हा त्या त्या राज्यांतील उत्पादन व ठोक मूल्यांच्या आधारे करण्यात आला आहे. कांदा, भाजीपाला उत्पादनाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्रात दरवर्षी 10 हजार 100 कोटी रुपयांची फळे, भाजीपाला नष्ट होतो. सर्वात जास्त भाजीपाल्याची नासाडी पश्चिम बंगालमध्ये होत असल्याचे आढळून आले असून त्या ठिकाणी नुकसानीचा आकडा 13 हजार 667 कोटी रुपये इतका आहे. त्या खालोखाल गुजरात (11,398 कोटी), बिहार (10,744 कोटी), उत्तर प्रदेश (10,312 कोटी), आंध्र प्रदेश(5,633 कोटी), तामिळनाडू (8, 170 कोटी), कर्नाटक (7415 कोटी), मध्य प्रदेश (5,332 कोटी) या राज्यांचा क्रमांक लागतो.

असोचेमचे अध्यक्ष राणा कपूर यांनी सांगितले की, भारतात खूपच कमी प्रमाणात म्हणजे केवळ 2 ते 3 टक्के प्रक्रियेचे काम होते. पोल्ट्रीची प्रक्रिया 6 ते 8 तर फिशरीज प्रक्रिया 10 ते 12 टक्के प्रक्रिया होते. फळे, भाजीपाल्यावरील प्रक्रिया उद्योग वाढण्यासाठी खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील संयुक्तरीत्या काम करण्याची गरज आहे. वेअर हाउसिंग तसेच कोल्ड स्टोरेजसाठी थेट व नियोजनात्मक पातळीवर प्रत्यक्ष काम आणि गुंतवणूक होण्याची गरज आहे. या संशोधनात असे आढळून आले की, देशात 2012 पर्यंत केवळ 301.1 लाख टन कोल्ड स्टोरेजची क्षमता होती. फळे व भाजीपाला उत्पादनाच्या तुलनेत ती केवळ 12.9 टक्के इतकीच आहे. ते वाढवण्याची गरज असल्याचे अहवालत म्हटले आहे.

कोल्ड स्टोअरेजचा अभाव
कोल्ड स्टोअरेज सुविधा सध्या केवळ ठोक बाजारासाठीच व त्याभोवतीच केंद्रित आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते आणि शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळत नाही. देशात फळे, भाजीपाल्याची सर्वाधिक विक्री स्थानिक बाजारपेठेतच होते. परंतु त्या ठिकाणी कोणतीच साठवण, कोल्ड स्टोरेज सुविधा असत नाही. देशात फळे, भाज्यांचे विपणन, प्रक्रिया उद्योग, सुविधा विकसित करण्याची गरज आहे. कारण सध्या एकूण उत्पादनापैकी केवळ 22.3 टक्के फळे, भाज्याच ठोक बाजारापर्यंत पोहोचतात.