आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांची मागणी कमी झाल्याने विक्री घटणार : सियाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिझर्व्ह बॅँकेने व्याजदर कमी केल्यानंतर वाहन विक्रीचा वेग वाढण्याच्या आशा पल्लवित झाल्या, पण प्रत्यक्षात मात्र तसे वातावरण नाही. ग्राहकांची नकारात्मक मानसिकता अद्याप कायम आहे. त्यामुळेच देशातील प्रवासी मोटारींच्या वार्षिक विक्री रिव्हर्स गिअर टाकत दशकभरात पहिल्यांदाच खालच्या पातळीवर गेली आहे. मागणी कमी झाल्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात मोटार विक्री केवळ 0 ते 1 टक्क्यांनी घटण्याची भीती ‘सियाम’ने व्यक्त केली आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑ टोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये देशातील वाहनांची विक्री जानेवारी महिन्यात 12.45 टक्क्यांनी घसरली असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून सलग तिस-या महिन्यात घसरणीचा सूर कायम राहिला आहे. देशातली प्रवासी मोटारींची विक्री अगोदरच्या वर्षातल्या जानेवारी महिन्यातील 1,98,079 मोटारींवरून यंदाच्या जानेवारी महिन्यात घसरून 1,73,420 मोटारींवर आली आहे. मोटार उद्योगाची घसरती कामगिरीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना ‘सियाम’ने यंदाच्या अर्थसंकल्पात अबकारी शुल्कात कपात करण्याबरोबरच या क्षेत्राला चालना देण्यासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान मोहीम योजनेंतर्गत व्यावसायिक वाहनांसाठी विशेष योजना राबवावी अशी मागणी केली आहे. गेल्या महिन्यात विक्रीने वाढ नोंदवली असली तरी प्रवासी मोटारींच्या विक्रीसाठीचे 0 - 1 टक्के वाढीचे लक्ष्य सध्या साध्य करणे शक्य नाही.

कंपनी जाने 11 (विक्री) जाने 12 (विक्री)
मारुती सुझुकी 88,377 88,557
ह्युंदाई मोटर इंडिया 33,756 34,247
टाटा मोटर्स 28,529 11,192