आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vehicle Insurance News In Marathi, Auto, Divya Marathi

ग्राहकांचा लाभ: वाहनाच्या मूल्यावर आधारित प्रीमियम बंद होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विमा कंपन्यांना आता वाहनाच्या वास्तविक किमतीपेक्षा कमी मूल्यावर आधारित विमा पॉलिसी देता येणार नाही. यामुळे ग्राहकांना वास्तविक मूल्याच्या आधारे जास्त क्लेम मिळणार आहे. साधारण विमा कंपन्यांच्या हितासाठी प्रयत्न करणार्‍या साधारण विमा परिषदेने (जनरल इन्शुरन्स कौन्सिल -जीआयसी) यासंदर्भात कार कंपन्या आणि विमा कंपन्या यांच्याच चर्चा केली आहे. कारची स्टँडर्ड व्हॅल्यू निश्चित करण्यासाठी जीआयसीने पुढाकार घेतला आहे. कारच्या वास्तविक मूल्यावर आधारित पॉलिसी मिळाल्याने विमा कंपन्या आणि ग्राहक या दोघांचा फायदा होणार आहे.

साधारण विमा परिषदेचे महासचिव एम. चंद्रशेखरन यांनी सांगितले, विमा व्यवसायात चांगल्या वृत्ती रुजाव्यात यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. अशा रीतीने आम्ही वाहन विमा व्यवहारात इन्शुरन्स डिक्लेयर्ड व्हॅल्यूचे (आयव्हीडी) एक परिमाण तयार करण्याच्या तयारीत आहोत. यामुळे कारच्या वास्तविक किमतीनुसार विमा पॉलिसी देण्यात येईल. चंद्रशेखरन यांच्या मते, सध्या अनेक विमा कंपन्या पाच लाख रुपये किमतीच्या कारसाठी चार लाख रुपयांची विमा पॉलिसी देतात. यामुळे ग्राहकाला त्या वेळी कमी प्रीमियम भरावा लागतो, मात्र क्लेमच्या वेळी त्याला नुकसान सोसावे लागते. कारण कारची मूळ किंमत किंवा खरी किंमत पाच लाख रुपये आहे आणि त्याला क्लेम मिळतो तो चार लाख रुपयांच्या मूल्यावर. विमा व्यवसायातील ही वृत्ती ग्राहक तसेच विमा कंपन्यांसाठी तोट्याचा व्यवहार आहे. त्यामुळे वाहन विमा पॉलिसी त्या त्या वाहनाच्या मूळ किमतीवर आधारित असावी. खासगी क्षेत्रातील साधारण विमा कंपनी भारती एक्सा जनरल इन्शुरन्सचे मुख्य व्यवस्थापक आणि सीईओ डॉ. अमरनाथ अनंतनारायणन यांच्या मते, वाहनाच्या वास्तविक किमतीपेक्षा कमी मूल्यावर विमा पॉलिसी दिल्यास ग्राहकांना कमी प्रीमियम भरावा लागतो. मात्र, काही दुर्घटना झाल्यास त्यांना क्लेम कमी मिळतो. समजा ही पॉलिसी मूळ किमतीवर असती तर क्लेमची रक्कम जास्त मिळाली असती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

फायदा काय
कारच्या वास्तविक मूल्यावर आधारित पॉलिसी मिळाल्याने विमा कंपन्या आणि ग्राहक या दोघांचा फायदा होणार.

सध्या काय घडते :
विमा कंपन्या पाच लाख रुपये किमतीच्या कारसाठी चार लाख रुपयांची विमा पॉलिसी देतात. यामुळे ग्राहकाला त्या वेळी कमी प्रीमियम भरावा लागतो, मात्र क्लेमच्या वेळी त्याला नुकसान सोसावे लागते.

परवानगी नाकारणार
० वाहनाच्या मूळ किमतीपेक्षा कमी मूल्यावर पॉलिसी देण्यास विमा कंपन्यांना मज्जाव
० कार कंपन्या आणि विमा कंपन्या यांच्याशी यासंदर्भात जीआयसीची चर्चा