आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरगळीमुळे वाहन कर्जावर ताण,व्यावसायिक वाहनांना जास्त फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औद्योगिक क्षेत्रातील मंदी, खासगी क्षेत्रातील वापराचे कमी झालेले प्रमाण, डिझेलच्या वाढत्या किमती या सर्व गोष्टींचा व्यावसायिक वाहनांच्या कर्जावरचा ताण वाढला आहे. हा ताण पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कायम राहण्याचा अंदाज एका अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.
औद्योगिक सुधारणांना होत असलेला विलंब आणि खासगी खर्चाचे आटलेले प्रमाण यामुळे पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तरी मध्यम, अवजड आणि हलक्या व्यावसायिक वाहनांच्या मागणीवर ताण पडण्याची शक्यता ‘इंडिया रेटिंग्ज’ने एका अहवालात व्यक्त केली आहे. स्थानिक विक्री कर वगळता गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने डिझेलच्या किमतीत लिटरमागे 50 पैशांनी वाढ केली.
डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने व्यावसायिक वाहन चालकांच्या नफ्याचे प्रमाण आणखी आटण्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. इंडिया रेटिंग या संस्थेने व्यावसायिक वाहन कर्जाच्या मत्ता कामगिरीचा दर्जाही ‘स्थिर’वरून आता ‘नकारात्मक’ असा केला आहे. त्याचबरोबर व्यावसायिक उपकरणांचा पतदर्जाही स्थिरऐवजी आता नकारात्मक केला आहे.