आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bike : सर्वाधिक अॅडव्हान्स क्रूझर लायनर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतापर्यंतच्या सर्वात अत्याधुनिक क्रूझर लायनरचे हे दोन मॉडेल आहेत. इंडियन चीफ विंटेज व ट्रायम्फ थंडरबर्ड स्ट्रॉम या दोन्ही बाइकच्या किमतीत व फीचर्समध्ये खूप फरक आहे.
अ. इंडियन चीफ विंटेज
1.ही इंडियन कंपनीची चीफ विंटेज बाइक आहे. विंडस्क्रीन याचे वैशिष्ट्य. यामुळे कीडे, कचरा डोळ्यात जाण्यास अटकाव होतो. विंडस्क्रीनला क्विक रीलीज तंत्राने फीट केले आहे. प्रसंगी याला काढून ठेवता येते.
2. तुम्हाला बाइक रायडिंगची हौस असेल, दिवसातून हजार किमीपेक्षा जास्त प्रवास असेल तर हा उत्तम पर्याय आहे. बाइकचे वजन ३७९ किलो आहे.
3. इन्स्ट्रूमेंट क्लस्टर छोटे असून यामुळे क्लासिक लूक मिळतो. यात कीलेस इग्निशन सिस्टिम आहे.
4. लूक बदलण्यासाठी लेदर सीट देण्यात आले आहे. यामुळे पायांना आराम मिळतो. बाइक चालवताना स्विडिश मसाजही मिळतो. आरामदायी राइडसाठी या बाइकला तोड नाही.
5. यात दिलेल्या ट्रू ड्यूएल एक्झॉस्टला खास पद्धतीने फिट करण्यात आले आहे. त्यामुळे बाइकचा कर्कश आवाज येत नाही. यातून थंडर साउंड येत असल्याने रायडरला चालवताना शानदार वाटते.
किंमत : रु.२८,४९,६००
एक्स-शोरूम, दिल्ली
ब. ट्रायम्फ थंडरबर्ड स्ट्रॉम
1. ट्रायम्फ थंडरबर्ड स्ट्रॉम बाइकमध्ये शक्तिशाली १६९९ सीसी, ९८ बीएचपी इंजिन असून हे सेडान कारपेक्षाही दर्जेदार आहे.
2. हँडलबार रुंद ठेवण्यात आले आहे. बाइक चालवण्यास आरामदायी आहे. याचा आकार मोठा असला तरीही मॉडेल अत्यंत सुंदर आहे.
3. पुढच्या बाजूला ट्विन फोर-पिस्टन कॅलिपर आहे. यात सिंगल ३१० एमएम डिस्क, मागच्या बाजूला ब्रेम्बो २- पिस्टन फ्लोटिंग कॅलिपर देण्यात आले आहेत. ही संपूर्ण एबीएस असिस्टेड असून जबरदस्त स्टॉपिंग पॉवर मिळते.
4. पिल्लन स्पेस जास्त नसून छोटी व उंच ठेवण्यात आली आहे. या सीटसोबत बॅकरेस्ट दिल्याने चालकास चालवण्याची मौज अनुभवता येते. मागे बसलेली व्यक्तीदेखील राइडचा मजा घेऊ शकते.
5. या क्रूझर लायनरच्या इंजिनवर स्टँडर्ड रेडिएटर कव्हर आहे. त्यामुळे बाइकला वेगळा लूक मिळतो. यावर क्रोम कव्हरसुद्धा आहे.
किंमत : रु.१३,५०,०००
एक्स-शोरूम, दिल्ली