आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Forcefull Manner Enters In Bike Production Anand Mahindra

ताकदीने उतरणार बाइक उत्पादनात, अडीच वर्षांत नवीन मॉडेल्स सादर करणार - आनंद महिंद्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - महिंद्रा अँड महिंद्राची उपकंपनी महिंद्रा टू व्हीलर्स आता अधिक ताकदीने मोटारसायकल उत्पादनात उतरणार असल्याचे संकेत महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सोमवारी दिले. आगामी अडीच वर्षांत दहा नवीन मोटारसायकल मॉडेल्स सादर करण्याचे लक्ष्य निश्चित केले असून दर तिमाहीत एक नवी गाडी बाजारात येणार असल्याचे महिंद्रा यांनी सांगितले. महिंद्राने सेंट्युरो बाजारात आणली.


जयपूरमध्ये हॉटेल मॅरियट येथे झालेल्या एका शानदार समारंभात महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा आणि महिंद्रा टू व्हीलर्सचे अध्यक्ष नवीन माथूर यांच्या हस्ते सेंट्युराचे सादरीकरण झाले. आकर्षक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या या मोटारसायकलची किंमतही स्पर्धकांच्या तुलनेत आकर्षक असून महिंद्राचा दर्जा, विश्वास, गुणवत्ता आणि मजबुती यामुळे सेंट्युरो बाजारात इतिहास घडवेल, असा आत्मविश्वास आनंद महिंद्रा यांनी या वेळी व्यक्त केला.


ग्राहकांकडून मिळालेल्या फीडबॅकमधून या मोटारसायकलची निर्मिती करताना पुरेपूर विचार करण्यात आला आहे. संशोधन, नावीन्य, इंजिनिअरिंग यांचा अजोड संगम असलेली ही पूर्णत: भारतीय तंत्रज्ञानाचा वापर असलेली मोटारसायकल असल्याचे महिंद्रा यांनी आवर्जून सांगितले.


वैशिष्ट्ये
आरामदायी आसन, सुखकर लांबचा प्रवास, देखभालमुक्त बॅटरी, पाच वर्षांच्या वॉरंटीसह चोरीपासून संरक्षण करण्यासाठी अनोखी अलार्म सुविधा, डिजिटल डॅशबोर्ड, सर्व्हिस रिमायंडर, एक लिटरमध्ये 85 किलोमीटर अंतर कापते, रिफिल फ्युएल इंडिकेटर


मूळ किंमत
45 हजार रु.
(एक्स शोरूम दिल्ली)
खास ऑफर
पहिल्या 10 हजार बुकिंगसाठी फक्त 44 हजार रु.