आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Soon Auto Riksaw Will Become Past And Quadricycles Will Take Place

बजाजच्या कारचा मार्ग मोकळा... एक ऑक्टोबरपासून धावणार आरई-60

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रस्ते परिवहन मंत्रालयाने बजाजच्या क्वाड्रिसायकल आरई-60 या चारचाकीला रस्त्यावर उतरवण्याची मान्यता दिली आहे. विधी मंत्रालयाने यापूर्वीच या श्रेणीला मंजुरी दिली आहे. बजाज ऑटोला यामुळे दिलासा मिळाला असून आरई-60 एक ऑक्टोबरपासून रस्त्यावर धावण्याच्या तयारीत आहे.
या संदर्भातील कागदपत्रे लवकरच बजाज ऑटोला देण्यात येणार आहेत. अनेक ऑटो कंपन्यांनी बजाजच्या क्वाड्रिसायकल आरई-60 या चारचाकी वाहनांबाबत आक्षेप नोंदवले होते. मात्र, रस्ते परिवहन मंत्रालयाने वाहनांच्या क्वाड्रिसायकल श्रेणीला मंजुरी दिली आहे. बजाज ऑटोने ही चारचाकी बाजारात आणण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाने मंजुरी देण्यापूर्वी आरई-60च्या अनेक सुरक्षा चाचण्या घेतल्या. त्यात ही चारचाकी उत्तीर्ण झाली. यात सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. चाचणीच्या वेळी या चारचाकीच्या ब्रेक आणि अन्य बाबींची कडक तपासणी करण्यात आली. ही चारचाकी ऑटोरिक्षाच्या तुलनेत जास्त सुरक्षित आहे.